हमीभाई शेख ‘छत्रपती पुरस्कारा’ने सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

हमीभाई शेख ‘छत्रपती पुरस्कारा’ने सन्मानित

 हमीभाई शेख ‘छत्रपती पुरस्कारा’ने सन्मानित

मा.आ.स्नेहलता कोल्हे व इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते वितरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः उंबरे, ता राहुरी येथील छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने  जिल्हास्तरीय मानाचा ‘छत्रपती पुरस्कार’ अहमदनगर जिल्हा प्रहार सचिव हमीदभाई शेख यांना माजी आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, प्रतिकुल परिस्थितीसी लढा देत आत्मविश्वासाने आपल्या क्षेतात आजवर चौफेर घोडदौड सुरु ठेवून समाजातील वंचित घटकांसाठी काम करणार्यांची छत्रपती प्रतिष्ठानने दखल घेऊन  त्यांच्या परिश्रमाची पावती म्हणून हा गौरवरुपी पुरस्कार बहाल केला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्यास बळ मिळेल असे सांगितले.पुरस्कारनंतर हमीदभाई शेख म्हणाले,  राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आशिर्वादाने व सर्व प्रहार दिव्यांग सैनिक यांच्या आपुलकीमुळे आज आपण योगदान देत आहोत. दिव्यांचे प्रश्न सोडून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून सुरु आहे. हा पुरस्कार मला साथ देणार्यां सर्वांचा आहे. त्यामुळे आमच्या कार्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यास मिळाला पुरस्कार हा आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद असाच आहे. हमीदभाई शेख यांनी संघटनेच्या माध्यमातून अपंगांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणार आहे. तसेच त्यांनी यावेळी  अहमदनगर महापालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांनी हयातीचा दाखले महापालिकेत जमा करावा असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती सेनेच्या वतीने केले.श्री.हमीदभाई शेख यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल मंत्री बच्चू कडू, वरिष्ठ पदाधिकारी व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी अभिनंदन केले. याप्रसंगी पोलिस उपनिरिक्षक गणेश शेळके, हभप इंदुरीकर महाराज, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे, जिल समन्वय आप्पासाहेब ढोकणे, विजय हजारे, संदेश रपारिया, किशोर सुर्यवंशी, संजय पुंड, मधुकर धाडगे,  कडूभाई पठण, गणेश शिंदे, निलेश शिंदे, चिंतामण तनपुरे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment