खोडदे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद ः औटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

खोडदे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद ः औटी

 खोडदे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद ः औटी

खोडेदे परिवाराने महिला सक्षमीकरणासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर शहरातील नगरपंचायतीच्या निवडणुका तोंडावर आले असताना विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करत होत असताना पारनेरचे शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश खोडदे व खोडदे परिवाराने भव्य आणि दिव्य आगळीवेगळे हळदीकुंकवाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी पारनेर शहरातील हजारो महिलांनी खंडेश्वर लॉन येथे या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खास महिला व पुरुषांसाठी स्वरसंगित हा गाण्याचा आकर्षक मनमोहक कार्यक्रमाचा आनंद निसर्गरम्य वातावरणात पार पडला यावेळी सुरूचीभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पारनेरच्या माजी सभापती जयश्रीताई औटी व शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती ताई पाचारणे या उपस्थित होत्या.
यावेळी विजय डोळ, पांडुरंग खोडदे उपनगराध्यक्ष दत्ता शेठ कुलट, दादा कावरे, सुमन बुगे, जयश्री औटी, यांची भाषणे झाली
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने पद्मजा पठारे वर्षाताई नगरे संध्याताई शेळके, सुषमा गणेश शेळके, सुषमा नितीन शेळके, सीमा औटी, संगीता ताई खोडदे उमाताई बोरुडे, प्रमिला तारडे, डोळ मॅडम उपस्थित होते.
विजय डोळ व कैलास श्रीमंदिरकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच स्वाती खोडदे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी बुगेवाडी परिसरातील कावरे, भुसारे, शिंदे, चत्तर, कुलट, चौधरी, मते, गाडगे,तराळ, दिघे, व्यवहारे, नाईक, वैद्य, थोरात सर्व माता भगिनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here