डीपी कनेक्शन जोडण्याचे आश्वासन दिल्याने भाजपचे आंदोलन स्थगित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

डीपी कनेक्शन जोडण्याचे आश्वासन दिल्याने भाजपचे आंदोलन स्थगित

 डीपी कनेक्शन जोडण्याचे आश्वासन दिल्याने भाजपचे आंदोलन स्थगित


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः विजबिल न भरणार्‍या शेतकर्‍यांचे कृषी पंप वीज तोडण्याचे आदेश मागे घेण्यात येऊन विनाअट कृषी पंपाची जोडणी करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने नितीन दिनकर यांनी निवेदन दिले होते तसेच नेवासाफाटा येथे बुधवार दि.24 फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता याबाबत तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मध्यस्थीने झालेल्या वीज वितरण कंपनी व भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या चर्चेत मुदत वाढवून देऊ,डीपी वरील कनेक्शन जोडण्यात येईल मात्र वीज बिल भरा असे आश्वासन व आवाहन वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्याने भाजपच्या वतीने बुधवारी होणारे रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,कार्यकारी अभियंता शरद चेचर,भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजपचे जिल्हा संघटन सचिव नितीन दिनकर,नगरसेवक इंजिनियर सुनीलराव वाघ माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी सहभाग घेतला.
वीज प्रश्नांच्या बाबत नेवासा तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये म्हणून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी महत्वाची भूमिका बजावून मोठे योगदान दिल्याबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष व जिल्हा संघटन चिटणीस नितीन दिनकर यांनी अधिकारी भाजप पदाधिकारी व उपस्थित शेतकर्‍यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment