निघोजच्या ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण करणारे फरार..... ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

निघोजच्या ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण करणारे फरार..... !

 निघोजच्या ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण करणारे फरार..... !

न्यायालयात आज झाला युक्तीवाद,आज जामिनाबाबत निर्णय ....


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः तालुक्यातील सर्वात मोठी व बहूचर्चित अशी निघोज ग्रामपंचायतची दि. 09/02/21 रोजी सरपंच पदाची निवडणूक असताना दोन ग्रामपंचायत सदस्य नामे दिगंबर भागाजी लाळगे व गणेश कवाद यांना मतदानाच्या दोन दिवस आधी गावातीलच विरोधी गटातील गुंड प्रवृतीच्या साधारण 20 ते 25 लोकांनी त्या दोघांचे खेड परीसरातून शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले होते व त्यांना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवून गैरमार्गाने निघोज ग्रामपंचायतीचा ताबा घेवून एकअर्थाने लोकशाहीचा गळा आवळून काळीमा फासवणारी कृती केली आहे.  दरम्यान खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर घटनेबाबत गैरकारदेशीर लोकांकडून शस्त्राचा धाक दाखवून मारहान करून दोघाजनांचे अपहरण केलेबाबतचा श्री. विठ्ठल भाउसाहेब कवाद रा. निघोज यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. तरी यातील अपहरण करण्यात आलेल्या दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी खेड पोलीस ठाणेत त्यांचेसोबत झालेल्या गैरकृत्याचे सत्य कथन करून जबाब दिला आहे. तरी त्यांनी दिलेल्या जबाबानंतर निघोजमधील त्यांचे विरोधीगटाचे धाबे दणानले असून त्यांची आता पोलीसांच्या अटकेपासून बचाव करणेसाठी पळापळ सुरू झालेली आहे. दरम्यान खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार निघोज ग्रामपंचातीचे सदस्य नामे सचिन वराळ, मंगेश वराळ यांनी अटकेच्या भितीपोटी अटकपूर्व जामीनासाठी खेड न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच विठ्ठल कवाद यांनी दिलेल्या फिर्यादीमधील आरोपी नामे सुनिल वराळ,निलेश घोडे, अजय वराळ,धोंडीबाउ जाधव,राहूल वराळ व इतर असे फरार झाले आहेत. तरी एकंदरीत ज्यांनी निघोजच्या दोन ग्रामपंचात सदस्यांचे अपहरण केले तेच आता स्वतःच्या अटकेच्या भितीपोटी पळापळ करताना दिसत आहेत.तरी सदरील अपहरण कृत्यामध्ये गावातील अजूनही बड्या नेत्यांचा हात असल्याचे निघोज ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.
         दरम्यान आम्ही निघोज ग्रामपंचातीचे अपहरण झालेल्या दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांचेशी संपर्क साधला असता ते कोणत्याही अमिशाला बळी पडले नसून त्यांचे विरोधी गटाने सरपंच पदाच्या निवडणूकीत त्यांना मतदानापासून वंचित ठेवून निघोज ग्रामपंचायत बळकावण्यासाठी त्याचे गावातील व इतर असे एकूण 24 ते 25 लोकांच्या गटाने शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले असल्याबाबत खेड पोलीसांकडे जबाबामध्ये सांगितले आहे. तरी त्यांचेसोबत झालेल्या गैरकृत्याबाबत कायदेशीर लढाई लढून झालेल्या अन्यायास वाचा फाडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
   वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेमधील अत्यंत महत्वाचा व तृतीय स्तरीय घटक म्हणजे ग्रामपंचात हे भारतीय लोकशाहीमधील जनतेच्या सर्वात जवळचा घटक व लोकशाहीचा कणा समजला जातो. परंतू निघोज ग्रामपंचायत मधील एका गटाने सत्ता मिळवण्यासाठी अगदी खालच्या थराला जावून दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण करून लोकशाहीस काळीमा फासवणारे कृत्ये केले असल्याबाबत निघोजच्या ग्रामस्थांमध्ये चर्चा चालू आहे. सदरील लोकशाहीस काळीमा फासवणार्‍या कृत्यास जिल्हयाचे व तालूक्याचे लोकप्रतिनीधी कशाप्रकारे पाहत आहेत. व झालेल्या अन्यायाबाबत त्यांना
न्याय मिळून देतील का याकडेच आता निघोजच्या ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

No comments:

Post a Comment