अनामप्रेम संस्थेत शिवजयंती साजरी! दिव्यांग बाधवांना फळांचे वाटप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

अनामप्रेम संस्थेत शिवजयंती साजरी! दिव्यांग बाधवांना फळांचे वाटप.

 अनामप्रेम संस्थेत शिवजयंती साजरी! दिव्यांग बाधवांना फळांचे वाटप.

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती अनामप्रेम संस्थेमध्ये साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनामप्रेम मधील दिव्यांग मुलांना फळांचे वाटप करण्यात आले.
अविनाश घुले म्हणाले की, शिवाजी महाराजांनी दीन-दुबळ्यांना आधार दिला. त्यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करुन ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालकांनी प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. दुबळ्यांना आधार देणे ही शिवाजी महाराजांची शिकवण होती. ती आज आचरणात आनण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, शहर वाहतूक शाखेचे पो.नि. विकास देवरे, सुदाम देशमुख, रामभाऊ नळकांडे, किरण बोरुडे, अतुल लहारे, भाऊसाहेब भाकरे, अजय चितळे, बाळासाहेब वामन, दत्ता वामन, अशोक औशिकर, विलास कराळे, संजय गवळी, गणेश आटोळे, निलेश कांबळे, सुनील सकट, गणेश गायकवाड, धन्ना उजागरे आदींसह चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment