सिव्हिल हॉस्पिटलला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्याचा मानस : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

सिव्हिल हॉस्पिटलला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्याचा मानस : आ. जगताप

 सिव्हिल हॉस्पिटलला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्याचा मानस : आ. जगताप

निती आयोगाचा जिल्हा शासकीय रक्तपेढीला देशात प्रथम मानांकन मिळाल्याबद्दल सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून एक आरोग्य मंदिर उभे करायचे आहे. या माध्यमातून एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये अभिमानाची एक बाब म्हणजे आरोग्य सेवेमध्ये सरकारी यंत्रणा सर्वात आधी पुढे आली, यात जिल्हा रुग्णालयाची काम कौतुकास्पद आहे. 2019-20 मध्ये जिल्हा शासकीय रक्तपेढीने सात हजार रक्त पिशव्यांचे कलेक्शन केले. तसेच कोरोना संसर्गाच्या काळातही सुमारे साडे चार हजार रक्त पिशव्यांचे संकलन केले. कोरोना काळात सिव्हिल हॉस्पिटलपासून सर्वसामान्य माणूस जाणेही टाळत होता. तरीसुद्धा नागरिकांमध्ये जनजागृती करून रक्तसंकलन करण्याचे काम करुन ते गरजू रुग्णापंर्यंत रक्त पिशव्या पोहचविण्याचे काम केले. त्यामुळे निती आयोगाचा जिल्हा शासकीय रक्तपेढीला प्रथम मानांकन मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केली.
जिल्हा शासकीय रक्तपेढीला भारतात निती आयोगाचा प्रथम मानांकन मिळाल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वसंतराव जमदाडे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुमया खान, डॉ.संध्या इंगोले, डॉ. मनोज घुगे, डॉ.गोकुळ गर्जे, योगेश दिघे, अमृत झांबरे, सचिन देवकर, अश्विनी भापसे, विशाल जाधव, आबासाहेब शेलार, हसन बासद, स्नेहल सावंत, ज्ञानेश्वर मगर, अशोक पवार, मोहन पोकळे व रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. सुनील पोखरणा म्हणाले की, सर्व रुग्णांपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू आहे. रक्तपेढील अधिकारी व कर्मचार्‍यांनी चांगले काम केल्यामुळेच आपल्याला आरोग्य क्षेत्रातील चांगला बहुमान मिळालेला आहे. असेच काम सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी व कर्मचार्‍यांनी करावे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment