नेप्ती ध्यान केंद्राच्यातीने स्थायी समिती सदस्य नगरसेवक सचिन शिंदे व कथक पदवीका परीक्षेत प्रथम आल्याबद्दल कु. पूर्वजा बोज्जा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

नेप्ती ध्यान केंद्राच्यातीने स्थायी समिती सदस्य नगरसेवक सचिन शिंदे व कथक पदवीका परीक्षेत प्रथम आल्याबद्दल कु. पूर्वजा बोज्जा सत्कार

 नेप्ती ध्यान केंद्राच्यातीने स्थायी समिती सदस्य नगरसेवक सचिन शिंदे व कथक पदवीका परीक्षेत प्रथम आल्याबद्दल कु. पूर्वजा बोज्जा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सहजयोग परिवार, नेप्ती,तालुका जिल्हा अहमदनगर च्या वतीने नगरसेवक सचिन शिंदे यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल व पूर्वजा बोज्जा ही महाराष्ट्र राज्यात कथक पदविका परीक्षेत प्रथम आल्याबद्दल पूनम मंगल कार्यालय, नगर-कल्याण रोड, अहमदनगर येथे सत्कार ठेवण्यात आला होता यावेळी बोलताना नगरसेवक सचिन शिंदे म्हणाले सहजयोग ध्यान साधनेचा फायदा हा लहान मुलांपासून वयोवृद्ध पर्यंत सर्वांनाच सर्वांगीण विकास करण्यासाठी होतो या ध्यान साधने मुळे मानसिक, शारीरिक परिस्थिती सुधारते व आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो पूर्वजा बोज्जा ही सहजयोगी  असल्यामुळे व ती ध्यान साधना करीत असल्यामुळेच तिला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविता आला. यासाठी सर्वांनी या सहजयोग ध्यान साधनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या वेळी नेप्ती ध्यान केंद्र प्रमुख लक्ष्मण अंदे म्हणाले नगरसेवक सचिन शिंदे यांनी हा हॉल विनामूल्य दिल्यामुळे या ठिकाणी ध्यान केंद्र सुरु करता आले. सहजयोग ध्यान केंद्र हे विनामूल्य स्वरूपात चालविले जात असून दर मंगळवारी सायंकाळी 6.30 वा. या कार्यालयात ध्यान केंद्रा सुरु झाले असून याचा लाभ साधकांनी घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक सचिन शिंदे यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सहजयोग चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच नगरसेवक सचिन शिंदे यांच्या हस्ते कु. पूर्वजा बोज्जा हिचा सत्कार करण्यात आला.मेजर कुंडलिक ढाकणे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गणेश कोडम यांनी मानले. या वेळी नेप्ती ध्यान केंद्र प्रमुख लक्ष्मण अंदे, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा,  डॉ.अशोक आगरकर, सौ. सिंधूताई तुवर, सौ. अनिता अंदे, सौ. सविता कोडम, सौ. स्वरा तुवर, लक्ष्मी मुनगापाटील, सौ. अश्विनी वाळेकर, सौ. नेत्रा दहिवाळे, पूजा आगरकर, वैष्णवी कोडम, रवींद्र आगरकर, मनोज बनसोडे, सौ. रजनी बनसोडे, मनोहर अंकम आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment