श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेश जयंती धार्मिक कार्यक्रमारोबरच सामाजिक उपक्रमांनी साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेश जयंती धार्मिक कार्यक्रमारोबरच सामाजिक उपक्रमांनी साजरा

 श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेश जयंती धार्मिक कार्यक्रमारोबरच सामाजिक उपक्रमांनी साजरा

सामुदायिक विवाह सोहळ्याने गणेश जयंतीची सांगता


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः येथील दातरंगे मळा एकदंत कॉलनीत श्री गणेश जयंतीला श्रींच्या मुर्तीची पालखीतुन मिरवणुक काढुन मिरवणुक मार्गावर आकर्षक रांगोळी रेखाटून  विविध सामाजिक संदेश देणारे घोष वाक्य काढण्यात आले, त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तांदळाच्या अक्षता न वापरता फुलांचा वर्षाव करुन अन्नाची नासदुस टाळुन एक वेगळा आदर्श सर्वांन समोर ठेवल्याने एकदंत गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. या जयंती उत्साहाचे भक्तीमय वातावरणात सांगता झाली. शहर व परिसरातील 1 नव वधु-वर गृहस्थाश्रमात बद्ध झाली. सामुदायिक विवाह सोहळा संकल्पनेतुन  गणेश जयंतीला वैवाहिक जीवनातील प्रवास सुरु केला. हा विवाह सोहळा उपक्रम भिमराज कोडम, राजु मंचे, चंद्रकांत बेत्ती, गणेश गुडा, अमर बुरा, शंकर कोंडा, अमोल गाजेंगी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला. एकदंत गणेश मंडळ दरवर्षी गणेश जयंतीला धार्मिक कार्यक्रमा बरोबरच सामाजिक विविध उपक्रम राबवित असल्याने परिसरात सर्वांनी समाधान व्यक्त केले.
दातरंगे मळा येथील एकदंत गणेश मंडळ दरवर्षी गणेश जयंती निमित्त गेल्या 17 वर्षांपासून सामाजिक कार्यात वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.  विवाह सोहळा साजरा करुन एक आगळा-वेगळा उपक्रम केला. या सामुदायिक विवाह सोहळ्यास सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित राहुन वधुवरांना शुभाशिर्वादासह सांसरीक भेट वस्तू मोठ्या प्रमाणात भेट देऊन नवदांम्पत्यांचा आनंद व्दिगुणित केला. सोमवारी गणेश मंदिरात श्री विघ्नेश्वर पुजन व श्री गणपती अथर्व शिर्षन, नाममुर्ती अभिषेक, होमहवन, श्री मुर्ती मिरवणुक व पूर्णाहुती, श्री सत्यनारायण महापूजा, सामुदायिक विवाह सोहळा, श्री महाप्रसाद व बाल मेळाव्याने गणेश जयंतीची सांगता झाली. मंडळाने काढलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी एकसारख्या साड्या परिधान करुन, लेझीम, पारंपारिक बात्कम्मा खेळ खेळत तसेच सर्व कार्यकर्त्यांनी  सहभागी झाले होते त्यामुळे सर्वाचे लक्ष वेधले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एकदंत गणेश मंदिर, एकदंत महिला बचत गट, एकदंत परिवार व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment