सरळ सेवा भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची महावितरणमध्ये नियुक्ती रखडली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

सरळ सेवा भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची महावितरणमध्ये नियुक्ती रखडली

 सरळ सेवा भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची महावितरणमध्ये नियुक्ती रखडली


अहमदनगर - 
महावितरण मधील उपकेंद्र सहाय्यकांची सरळ सेवा भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या एन.सी.टी.व्हीं.टी.  दिल्ली बोर्ड प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांची महावितरणमध्ये नियुक्ती रखडली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्यावतीने राहुरी येथे राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्तदादा तनपुरेयांची भेट घेऊन मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे भाऊसाहेब भाकरे, आर.पी थोरात, ताराचंद कोल्हे, अनिल शिरसाठ, गुलाब डोंगरे, बाळासाहेब वामन, भास्करराव तरटे, त्तात्रय थोरात, सोमनाथ शिंगटे, श्‍याम वाकळे, बापूसाहेब जगदाळे, अमोल सांगळे आदी उपस्थित होते.                             

विद्युत महावितरण आने तत्कालीन विद्युत मंडळांमध्ये जेव्हा जेव्हा सरळ सेवा भरती झाली तेव्हा एन.सी.टी.व्हीं.टी.  दिल्ली बोर्ड प्रमाणपत्र  नसतानाही प्रोविजनल प्रमाणपत्राच्या आधारे रुजू करून घेतले आहे त्या धर्तीवर आता ही पाचशे उमेदवारांना महावितरणमध्ये हजर करण्यास टाळाटाळ करत आहे ही बाब ऊर्जा राज्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी तत्काळ महावितरण कंपनीचे संचालक भालचंद्र खंडाईत यांना भ्रमणध्वनीद्वारे आदेशित केले की 1 फेब्रुवारी 10 वाजता सह्याद्री अतिथी गृहात संपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे व या बैठकीमध्ये संघटनेला खात्री आहे उद्या चर्चेत मागील भरती मध्ये जसे प्रोविजन प्रमाणपत्र द्वारे उमेदवारांना रुजू करून घेतले तसेच आताही तसा निर्णय होईल व सध्या कोरोना या काळात व्यापक महाअधिवेशन न घेता सेमी अधिवेशन चे निमंत्रण ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिले असता त्यांनी ते स्वीकारले व 21 फेब्रुवारी रोजी राहुरी येथे अधिवेशनास उपस्थित राहण्यास सहमती दिली.

No comments:

Post a Comment