रमाई आवास योजनेचे प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

रमाई आवास योजनेचे प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

 रमाई आवास योजनेचे प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः रमाई आवास योजने अंतर्गत पारनेर शहरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांनी आपले प्रस्ताव नगर पंचायतीकडे दाखल करावे असे आवाहन आर पी आय तालुका अध्यक्ष अमित जाधव, यांनी केले आहे. जाधव हे  लाभार्त्या सहित 24/02/2020रोजी नगरपंचायत कार्यालया समोर ,रमाई आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर करावी या साठी उपोषणास बसले होते,
सातत्याने जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी, तसेच आमदार निलेशजी लंके यांच्या कडे पाठपुरावा केला होता,त्याला मोठे यश मिळाले आहे.मागील 4 वर्षा पासून  रमाई आवास योजना कक्षच कार्यान्वित नव्हता सादर बाब लक्षात आल्यानंतर अमित जाधव यांनी या बाबत आवाज उठवला होता, आमदार निलेशजी लंके यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता.त्या नंतर मुख्याधिकारी कुमावत मॅडम यांनी सादर कक्ष स्थापन करीत, यास प्रतिसाद दिला.
रमाई आवास योजने साठी पारनेर शहरातील,आनूसुचित जातीच्या  लोकांनी लवकरात लवकर नगरपंचायत कडे प्रस्ताव सादर करावे, अशी आव्हान जाधव यांनी केले.
 जाधव यांच्या पाठपुराव्या मूळे अनेक वंचित कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

No comments:

Post a Comment