विकासकामातून जनतेचा विश्वास संपादन करणार ः ज्योती गाडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

विकासकामातून जनतेचा विश्वास संपादन करणार ः ज्योती गाडे

 विकासकामातून जनतेचा विश्वास संपादन करणार ः ज्योती गाडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रभाग क्र 4 च्या सर्वागिण विकासासाठी मी कटीबद्ध आहे. निवडणूकीच्या काळामध्ये प्रभागातील जनतेला विकासकामाचे जे आश्वासने दिली होती ते पूर्ण करून जनतेचा विश्वास संपादन करणार सर्वांना बरोबर घेऊन प्रभागातील विकास कामे दर्जेदार करू. प्रभागाचा विकास आराखडा तयार केला आहे जमिनीअंतर्गतील पिण्याच्या पाण्याची लाईन भुयारी गटारी विकासाची कामे सर्वात प्रथम केली जात आहे. पुन्हा पुन्हा रस्ता खोदण्याची वेळ आपणावर येऊ नये त्यानंतर लगेच रस्त्याची डाबरीकरणाची व सुशोभिकरण करण्याची कामे हाती घेण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजूर असून लवकरच कामे सुरू होतील. फकीरवाडा येथे अनेक दिवसातून प्रलंबित असलेला ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लावला आहे. प्रभाग हा स्वच्छ, सुंदर व हरित
करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असते यासाठी नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा. त्यामुळे नागरिकाच्या आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होते फकीरवाड्याचा सर्वागिण विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ. प्रभागामधील महापालिकेचे ओपन स्पेनमध्ये उद्यान विकसित करणार आहे. खेळाडूंसाठी मैदानाची निर्मिती करणार आहे. याचबरोबर सकारात्मक दृष्टीकोनातून प्रत्येकाने वृक्षारोपन व त्याचे संवर्धन करून जनजागृती करावी असे प्रतिपादन नगर सेविका ज्योती गाडे यांनी केले. संजय सतवाणी म्हणाले की, अनेक दिवसापासून गटारीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरत होते. त्यामुळे नागरिकांना पावसाच्या पाण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते नगरसेविका ज्योती गाडे यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे.
   प्रभागातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत असतात असे ते म्हणाले. प्रभाग क्र 4 मधील फकीरवाडा येथे बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ करताना नगरसेविका ज्योती गाडे समवेत उद्योजक अमोल गाडे, सुरेखा सांगळे, सादिक शेख, जावेद सय्यद, शेहबाद शेख, जमिर मिस्तरी, संजय सतवाणी, वसिम शेख, अंजली सतवाणी, आफताफ सय्यद, साहिद शेख, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here