कै. देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीस व मनपाच्या सौर ऊर्जा प्रकल्पास निधी मंजूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

कै. देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीस व मनपाच्या सौर ऊर्जा प्रकल्पास निधी मंजूर

 कै. देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीस व मनपाच्या सौर ऊर्जा प्रकल्पास निधी मंजूर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन बांधकाम व महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून निधी मंजूर झाला आहे. याप्रसंगी बोलताना आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी सांगितले की, आज दि.10 फेब्रुवारी 2021 रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्यस्तरीय विभागीय जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीत विशेष बाब म्हणून आपल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी 2 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प तसेच कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला व याबाबत तत्काळ कार्यवाही करणेबाबत जिल्हा अधिकारी अहमदनगर यांना माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी आदेश दिले. याप्रसंगी आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment