धूम स्टाईलने सोने लुटणार्‍या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

धूम स्टाईलने सोने लुटणार्‍या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा

 धूम स्टाईलने सोने लुटणार्‍या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा

महापौरांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरात व उपनगरांमध्ये धूम स्टाईलने व दरोडे घालून सोने लुटणार्‍या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच रस्त्यावर फिरणार्‍या महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून नेण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. त्यामुळे नागरिक अतिशय भयभीत झाले आहेत. सोने लुटणार्‍या चोरांना त्वरित गजाआड करण्यासाठी शहर व उपनगरात पोलीस गस्त वाढविण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या नगर शहर व उपनगरामध्ये धूम स्टाईल व दरोडे, लहान-मोठ्या चोर्‍या यांचा सुळसुळाट झालेला आहे. शहर व उपनगरात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये सोने लुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. चोर भरदिवसा तसेच सायंकाळच्या वेळेस घरावर दरोडा टाकून लूटमार करीत आहेत. तसेच रस्त्यावर फिरणार्‍या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, दागिने लुटण्याचा राजरोस प्रकार सुरू आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहर व उपनगरामध्ये घडणार्‍या अशा घटनांमुळे नागरिक माझेकडे व संबंधित भागातील नगरसेवक यांचेकडे देखील तक्रारी करून पोलीस गस्त वाढविणे बाबत मागणी करीत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. नुकतेच कोविड महामारी आटोक्यात येत असून नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत याचा फायदा घेऊन चोरांनी चोरीची सत्र सुरू केले आहे. हे थांबने गरजेचे आहे याकरिता तपास यंत्रणा सक्षम करून चोरांना त्वरित गजाआड करणे आवश्यक आहे. या दृष्टीने तपास यंत्रणेद्वारे चोरांना गजाआड करून शहर व उपनगरामध्ये पोलिस गस्त वाढविणे बाबत कार्यवाही करावी.

No comments:

Post a Comment