मोटार सायकल प्रशिक्षणामुळे चोर्‍यांना आळा बसेल- मनोज पाटील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

मोटार सायकल प्रशिक्षणामुळे चोर्‍यांना आळा बसेल- मनोज पाटील

 मोटार सायकल प्रशिक्षणामुळे चोर्‍यांना आळा बसेल- मनोज पाटील


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सद्यस्थितीत नगर शहरासह जिल्हाभरात मोटरसायकलवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे प्रमाण वाढत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांना वेगळ्या प्रकारचे मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. नगर-कल्याण महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज इंजीनियरिंग कॉलेज मध्ये जिल्हाभरातील पोलीस कर्मचार्‍यांसाठी आयोजित मोटारसायकल प्रशिक्षणाच्या वेळी पाटील बोलत होते.
ते म्हणाले की, दिवसेंदिवस रस्त्यांवरील गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्त्यावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करायचे असल्यास पोलीस कर्मचार्‍यांना नवीन पद्धतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता आज जिल्हाभरातील बीटवर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांसाठी मोटरसायकल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात रस्त्यावरील गुन्हा घडल्यास पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करताना वाहन कशाप्रकारे चालवायचे, आरोपीचा पाठलाग करताना नागरिकांची सुरक्षितता कशाप्रकारे जपायची, तसेच आरोपीला सुरक्षित पद्धतीने कसे पकडायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा फायदा भविष्यामध्ये एकाही घटनेचा तपास करण्यासाठी झाला तर आजचे प्रशिक्षण लाभदायी ठरेल, असाही विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रशिक्षणात जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांनी सहभाग घेतला आहे. नवीन प्रकारची माहिती समजावून घेण्याचा जो प्रयत्न अधिकारी व कर्मचार्‍यांनी केला आहे, तो नक्कीच प्रशंसनीय आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक विकास देवरे, पुणे येथील प्रशिक्षक संग्राम देवेकर, वरद मोरे, प्राचार्य डॉक्टर नगरकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment