छत्रपती शिवराय हा विचारच- सहा.पो.नि.देशमुख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

छत्रपती शिवराय हा विचारच- सहा.पो.नि.देशमुख

 छत्रपती शिवराय हा विचारच- सहा.पो.नि.देशमुख


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवराय यांनी गरीबातील गरीब रयतेला कधीही काही कमी पडू दिले नाही. छत्रपती शिवरायांचे विचार हे रयतेच्या मनामनात मातीच्या कणाकणात रुजलेले आहेत. छत्रपती शिवराय हे एक व्यक्ती नव्हे, तर तो एक विचार होता. तो प्रत्येकाच्या मनात रुजला आहे. जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्याबाबत शासनाने काही नियम घालून दिले असून, त्याचे पालन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पोलीस प्रशासनाने कुठल्याही सण, उत्सवाला कधीही आडकाठी आणली नाही. मात्र, कोरोनामुळे नियम पाळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी केले.
भिंंगारमधील खळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख बोलत होते. याप्रसंगी भिंगार अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे, एस. डी. पठाण, सतीश पिंपळे, अमोल वाघस्कर, अविनाश लांडगे, धिरज मट्टू, रोहित आवारे, संदीप हराळे, संजय पिंपळे, सुदर्शन काळे, विजय धाडगे, रमेश तनपुरे, सूरज बोबडे, कोंडिराम वाघस्कर, संपत बेरड, संजय सपकाळ, रमेश कडुस, आकाश बेरड, श्याम वाघस्कर, गणेश बोठे, संजय क्षीरसागर, अशोक क्षीरसागर, दत्तात्रय वाघस्कर, बाबासाहेब चव्हाण, संजय बेरड, तुषार मोरे, रवी कासवदे, भरत थोरात आदी उपस्थित होते.  यावेळी छत्रपतींच्या पुतळ्यावर तोफेद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आले.
श्री. देशमुख पुढे म्हणाले की, छत्रपतींचे विचार घेऊन आज सर्व समाज काम करीत आहे. समाजाला आज खर्या अर्थाने त्यांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारांची कास धरून जीवनात वाटचाल केल्यास तुमचे जीवन यशस्वीच होईल, असे सांगितले.
अनिल झोडगे म्हणाले की, छत्रपती शिवाजीमहाराज हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविले, असे ते म्हणाले.
सतीश पिंपळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही, तर अखिल भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तिदायी दैवत आहे. त्यांनी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी, असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुरुवातीला अवघ्या काही मावळ्यांची साथ होती. कमी मनुष्यबळातही बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्यांनी गनिमी कावा या युद्धनितीचा वापर केला, असे ते म्हणाले.
दुपारी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अमोल वाघस्कर यांनी केले, तर आभार भरत थोरात यांनी मानले.

No comments:

Post a Comment