श्री मार्कंडेय प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - मनोज दुलम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

श्री मार्कंडेय प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - मनोज दुलम

 श्री मार्कंडेय प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - मनोज दुलम

श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने श्री मार्कंडेय जयंती उत्साहात साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जयंती साजरी करताना सामाजिक कार्यातून  अनेक गरजूंना मदतीचा हात मिळतो. त्यामुळे सामाजिक उपक्रमांनी प्रत्येक जयंती साजरी झाली पाहिजे, जेणे करुन वंचित, दिनदुबळ्यांना, गरजूंना याचा मोठा लाभ होते. मार्कंडेय जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानेच कार्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मनपा सभागृह नेता मनोज दुलम यांनी केले.
श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने श्री मार्कंडेय जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचा व महाप्रसाचा  शुभारंभ श्री मार्कंडेय यांच्या प्रतिमेस पुष्पहार सभागृह नेता मनोज दुलम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै.शुभम सुंकी, अमोल बोल्ली, अमित गाली, योगेश न्यालपेल्ली, किशोर शिंदे, अजय लयचेट्टी, अमित सुंकी, आकाश आरकल, विशाल जव्हेरी, प्रविण सुंकी, राजू म्याना, सुमित गाली, रितेश गाली, गणेश अवधुत, राहुल म्याना आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना दुलम म्हणाले कि, कोरोना या महामारीमुळे गरजूंना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. प्रतिष्ठानच्यावतीने कोरोना काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवुन त्यांना मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत यावर्षी त्यांनी प्रतिष्ठाच्यावतीने जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करुन चांगली सेवा देण्याचे काम त्यांनी केले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी प्रतिष्ठाचे अध्यक्ष पै.शुभम सुंकी म्हणाले कि, प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या 10 वर्षापासून श्री मार्कंडेय जयंती साजरी करण्यात येते. यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तगट तपासणी, रक्तदान शिबीर असे अनेक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात येते. यावर्षी कोरोना या महामारीमुळे शाळा बंद असल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करुन गरजूंना मदत म्हणून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचे असंख्य भाविकांनी लाभ घेतला, असे त्यांनी सांगितले.
जयंती उत्सवा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल बोल्ली, अविनाश शिरापुरी, अमित गाली, योगेश न्यालपेल्ली, किशोर शिंदे, अजय लयचेट्टी, अमित सुंकी, आकाश आरकल, विशाल जव्हेरी, प्रविण सुंकी, राजू म्याना, सुमित गाली, रितेश गाली, गणेश अवधुत, राहुल म्याना आदी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment