राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. शिंदे

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. शिंदे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या अहमदनगर जिल्हा जिल्हाध्यक्षपदी प्रा. श्याम शिंदे यांची निवड केली.
या निवडीचे पत्र राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी कर्जत तालुकाध्यक्ष काका तपकीर तसेच अहमदनगर शहर राष्ट्रवादीचे संघटक राजेश भालेराव, युवा कार्यकर्ते संचित निकम, जेष्ठ कला दिग्दर्शक सुधीर देशपांडे, शिवाजी रणसिंग, नंदेश शिंदे, श्रेयस शिंदे, कुंदा शिंदे उपस्थीत होते.
यावेळी बोलताना राजेंद्र फाळके म्हणाले, संप्तरंगच्या माध्यामातून गेल्या 34 वर्षापासून नगर जिल्ह्याबरोबरच राज्यभर त्यांनी नाट्य, चित्रपट, मालिकांसाठी अनेक कलावंत घडवले, याबरोबरच नाट्य क्षेत्रात दिग्ददर्शन, लेखन, अभिनय, राज्य नाट्यस्पर्धेचे परिक्षण या क्षेत्रात प्रा. श्याम शिंदे यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे.
राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी श्याम शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. अगामी काळात पक्षाच्या माध्यमातून अगामी काळात सांस्कृतिक क्षेत्रात दिल्हा अग्रस्थानी राहील असेही यावेळी फाळके म्हणाले.
श्री.शिंदे यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्रामभैय्या जगताप आणि अहमदनगरच्या कला क्षेत्रातील अनेकांनी प्रा. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment