श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

 श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त श्री मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार दि.14 फेब्रुवारी 2021 रोजी दु.12 ते 4 वाजता श्री मार्कंडेय मंदिर, गांधी मैदान,अ.नगर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम सुंकी यांनी दिली.श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त रविवार दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा.रुद्राभिषेक, स.8 वा.होमहवन, स.10 वा.सत्यनारायण महापुजा, स.11 वा.महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद (भंडारा) होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले.

No comments:

Post a Comment