‘युनिफाईड डीसीआर’ हा उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय - ना. एकनाथ शिंदे, निधी देताना महापौर करतात दुजाभाव; शिवसेनेची तक्रार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

‘युनिफाईड डीसीआर’ हा उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय - ना. एकनाथ शिंदे, निधी देताना महापौर करतात दुजाभाव; शिवसेनेची तक्रार.

 निधी देताना महापौर करतात दुजाभाव; शिवसेनेची तक्रार.

राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष नाही!

‘युनिफाईड डीसीआर’ हा उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय - ना. एकनाथ शिंदे.

याप्रसंगी नगर शहरातील विविध प्रश्नांविषयी शिवसेना नगरसेवकांनी आपली मते मांडली. त्यात सत्ताधारी भाजप महापौर बाबासाहेब वाकळे हे शिवसेना नगरसेवकांना निधी देताना दुजाभाव करत असल्याची मुद्दा शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी उपस्थित केला. सातपुते यांच्या मुद्द्यावर शिवसेनेचे इतर नगरसेवकही आक्रमक झाले.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः राज्यपाल भगतसिंग कौश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मध्ये कोणताही संघर्ष नसून राज्यपाल हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. काल राज्यपालांबाबत जो प्रकार घडला त्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले असल्याचे प्रतिपादन नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ना.एकनाथ शिंदे आज नगर जिल्हा दौर्‍यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये अहमदनगर महापालिका अंतर्गत विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणी व विकासकाम आढावा शिंदे यांनी घेतला या प्रसंगी ते बोलत होते.
ना. शिंदे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मी आलो आहे. नगरपरिषदा व महानगरपालिका, अधिकार्‍यांशी चर्चा करून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. नॅशनल हायवे क्र 222 साठी राज्य शासनाकडून 28 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत याबाबत लवकर कार्यवाही व्हावी. अशी मागणी नगरसेवक शाम (आप्पा) नळकांडे व नगरसेवक अनिल बोरुडे यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक मदन आढाव, दत्ता जाधव, गणेश कवडे यांनी निधीचा हा मुद्दा उचलून धरला. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आमदार आशुतोष काळे, उपमहापौर मालनताई ढोणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment