अहमदनगर मनपा आयुक्तपदी शंकर गोरे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 12, 2021

अहमदनगर मनपा आयुक्तपदी शंकर गोरे.

 अहमदनगर मनपा आयुक्तपदी शंकर गोरे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर मनपा आयुक्तपदी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असणार्‍या शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधात यांनी जारी केले आहेत.
31 डिसेंबर 2020 मध्ये मनपा तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार निवृत्त झाल्यापासून आयुक्तपद रिक्त होते. नगर मनपाला चांगला कर्तव्यदक्ष आयुक्त मिळावा अशी नगरकरांची मागणी होती. आज ही मागणी पूर्ण झाली शहरात आजही पिण्याचे पाणी, गटार योजना, खराब झालेले रस्ते अशा अनेक समस्या आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याकडे दीड महिन्यांपासून आयुक्त पदाचा पदभार होता. त्यांनी अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. नवे मनपा आयुक्त शंकर गोरे नगरकरांना विकासाकडे नेवूूून जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here