वाहन चालकांनी हेल्मेट वापरुन नियम पाळले तरच अपघात निर्मुलन होईल- निखिल वारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

वाहन चालकांनी हेल्मेट वापरुन नियम पाळले तरच अपघात निर्मुलन होईल- निखिल वारे

 वाहन चालकांनी हेल्मेट वापरुन नियम पाळले तरच अपघात निर्मुलन होईल- निखिल वारे

प्रभाग 2 मध्ये प्रतिज्ञा पत्रक वाटून जनजागृती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वाढत्या लोकसंख्येबरोबरच गरजा वाढत असतात. पूर्वी एका घरातील 4 व्यक्तींना एक वाहन असायचे, आता प्रत्येकाला स्वतंत्र्य वाहन गरज म्हणून असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. वाहन चालकांनी हेल्मेट वापरुन वाहतुकीचे नियम पाळली तरच खर्या अर्थाने रस्ता अपघात निर्मुलन होईल, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
प्रभाग क्र.2 मध्ये वाहन चालकांना प्रतिज्ञा पत्रके वाटून जनजागृती अभियान रस्ता अपघात निर्मुलन प्रबोधन मंचच्यावतीने राबविण्यात आले. यावेळी श्री.वारे यांच्या हस्ते ही प्रतिज्ञा पत्रके वाटप करुन वाहतुक सुरक्षा पंधरवाडाची सांगता करण्यात आली. यावेळी ते वाहन चालकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी मंचचे संस्थापक शेख कुतुबुद्दीन, सल्लागार हेमंत बल्लाळ, सुधाकर देशपांडे, विभिषण अनभुले, रवी वारे, स्वामी म्हस्के, बापू गायकवाड, सतीश शहा, माऊली गायकवाड, तुषार जवरे, प्रकाश दहिफळे, सतीष बल्लाळ, कन्हैय्या मुनोत आदि उपस्थित होते. श्री. वारे पुढे म्हणाले, प्रभाग 2 मध्ये प्रत्येक कॉलनीतील रस्ते डांबरीकरण करण्याचा मानस आहे. काही ठिकाणी पूर्ण झाले तर काही ठिकाणी कामे सुरु आहेत. स्वच्छ सुंदर शहर संकल्पना प्रत्यक्षात साकारुन अपघातास आळा कसा बसेल याची काळजी घेणार असल्याचे सांगितले.मंचचे संस्थापक कुतुबुद्दीन शेख म्हणाले की, सर्व रोगांवर निर्मुलन होतात, देवी, पोलिओ, कुष्ठरोग सारख्या रोगांचे निर्मुलन झाले. अपघाताचे निर्मुलन कधी होईल ते करण्यासाठी दरवर्षी आम्ही प्रतिज्ञापत्रे वाटून जनजागृती करुन वाहन चालकांना सूचना करतो, काही प्रमाणात यश मिळाले आहे, असे ते म्हणाले. हेमंत बल्लाळ यावेळी म्हणाले की, वाहने चालवितांना प्रत्येकाने नियम पाळले तर रस्ता अपघात होणार नाहीत. मोबाईलवर बोलत वाहन चालवितांना मोठे अपघात झालेले आहेत. तेव्हा मोबाईलवर बोलत वाहने चालवू नका. वाहतुक पोलिसांना सहकार्य करा नियम पाळले तर 90 टक्के अपघातच होणार नाहीत, त्यामुळे वाहतुक पोलिसांवरील ताण कमी होईल, असे ते म्हणाले. यावेळी अनिकेत चेमटे, तुंवर नाना, पहिलवान सर, गुंफेकर साहेब, प्रा.सुभाष कडलग, चव्हाण साहेब, सिंग साहेब आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here