मनपाची प्रभाग 9 मध्ये पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

मनपाची प्रभाग 9 मध्ये पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू

 मनपाची प्रभाग 9 मध्ये पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरातील प्रभाग 9 मधील श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द ठरल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 12 मार्चला प्रसिद्ध केली जाणार आहे. नवी मुंबई, वसई-विरार व कोल्हापूर या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच 16 महानगर पालिकेतील रिक्त 25 जागांसाठी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभाग नऊ मधील श्रीपाद छिंदम अनर्ह ठरवल्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. छिंदमने अपक्ष निवडणूक लढवून डिसेबंर 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला होता. परंतु, आता छिंदमच्या अनर्हतेमुळे या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. 15 जानेवारी 2021 पर्यंत अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रभागनिहाय प्रारूप यादी 16 फेब्रुवारी, हरकती व सूचनांसाठी 3 मार्चपर्यंत मुदत असणार आहे. मतदान केंद्रांची यादी 8 मार्च तर अंतिम यादी 12 मार्चला प्रिद्ध केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here