स्वच्छतेबाबत शहराला 10च्या आत क्रमांक मिळण्यासाठी नागरिकांनी सहयोग द्यावा ः वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 24, 2021

स्वच्छतेबाबत शहराला 10च्या आत क्रमांक मिळण्यासाठी नागरिकांनी सहयोग द्यावा ः वाकळे

 स्वच्छतेबाबत शहराला 10च्या आत क्रमांक मिळण्यासाठी नागरिकांनी सहयोग द्यावा ः वाकळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत स्वच्छते बाबत आयोजित केलेल्या स्पर्धेचे पारितोतषिक वितरण समारंभ मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, उपायुक्त श्री.यशवंत डांगे, हरियालीचे श्री.सुरेश खामकर, माजी नगरसेवक मा.श्री.दामूशेठ बठेजा, स्वच्छता निरिक्षक श्री.भांगरे, श्री.किशोर कानडे, श्री.सोनू चौधरी  आदी उपस्थित होते. यावेळी पारितोषिक घेण्यासाठी डीवायएसपी श्रीमती प्रांजलीताई सोनवणे, पोलिस निरिक्षक श्री.राजेंद्र भोसले, ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचे डॉ.यादव, आयकर अधिकारी श्री.विकास गायकवाड, प्राचार्य श्रीमती गीताताई तांबे, श्रीमती गोदावरीताई किर्तने, उपप्राचार्य श्रीमती कांचन पापडेजा, श्रीमती वैशाली मेकर, सौ.माचवे ,श्री.प्रमोद चट्टा, श्री.वर्धमान शिंगवी, श्री. देवेंद्र मट्टा, सुरभी हॉस्पीटल संचालक डॉ.राकेश गांधी, डॉ.अशिष भंडारी, डॉ.गणेश जंगले, डॉ.अमितकुमार पवार,  मेजर देवदान कळकुंबे,  आदीनी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे यांचे शुभहस्ते पारितोषिक स्विकारले.
अ.नगर मनपाच्या माध्यमातून स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 ची कार्यवाही नगर शहरात सुरू असून विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम व प्रकल्प राबविण्यात येते आहेत. यामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून शहर स्वच्छतेसाठी सकारात्मक सहयोग दयावा जेणे करून स्वच्छ सर्व्हेक्षणाचा नगर शहराचा 10 च्या आत क्रमांक येईल. आणि शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होईल. असे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले नगर शहरामध्ये 60 घंटागाडयांच्या माध्यमातून दैनंदिनपणे कचरा संकलन करण्यात येत असून त्या कच-यावर प्रकल्पावर खत निर्मीती व बायोगॅस तयार करण्यात येत आहे. नागरिकांनीही आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगळा ठेवून ओल्या कच-या पासून सेंद्रीय खत करावे किंवा बायोगॅस करावा. आणि सुका कचरा भंगार गोळा करणारे यांचेकडे दयावा. अशा प्रकारे कच-याचे वर्गीकरण केल्यास कच-यास किंमत प्राप्त होते व त्यांचे पुर्नचक्रीकरण होवून तो पुर्नर वापरात येतो. नगर शहर हे कंटेनर व कचराकुंडी मुक्त झालेले आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शहरामध्ये स्वच्छते संदर्भातील कामे करण्यासाठी  मा.केंद्र सरकार व मा.राज्य सरकार यांच्या कडून भरघोस निधी उपलब्ध केलेला असून त्या निधीतून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. आता नागरिकांनीही व विविध सामाजिक संस्था, शाळा, हॉटेल, हॉस्पीटल, महिला बचत गट, व्यापारी संकुल, शासकीय कार्यालय यांनी या अभियानात सहयोग देवून आपले शहर राज्यात व देशात स्वच्छते बाबत नांव उंचावेल असे कार्य करावे असे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्हणाले.यावेळी उपस्थितांनी स्वच्छते बाबतच्या सुचना तसेच समस्या मांडल्या.
उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे यांनी बोलताना स्वच्छतेत महिलांचा दैनंदिन पणे मोठा सहभाग असतो. घरादाराची स्वच्छता त्या करित असल्यामुळे घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच घरातील लहान मुलांवर स्वच्छतेचे संस्कार रूजवावेत. जेणे करून भविष्यातील भारत स्वच्छ सुंदर राहील.उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 ची प्रक्रिया सविस्तर विषद करताना नागरिकांच्या प्रतिक्रिया, स्वच्छता अप , याबाबत सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here