गावाचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेऊन कार्य करणार -प्रियंका लामखडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

गावाचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेऊन कार्य करणार -प्रियंका लामखडे

 गावाचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेऊन कार्य करणार -प्रियंका लामखडे

निंबळकच्या सरपंचपदी प्रियंका लामखडे यांची निवड तर उपसरपंचपदी बाळासाहेब कोतकर


अहमदनगर -
निंबळक (ता. नगर) येथे मंगळवार (दि.9 फेब्रुवारी) सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निंबळकच्या सरपंचपदी प्रियंका अजय लामखडे यांची सतरा पैकी अकरा मतांनी निवडून आल्या. तर उपसरपंचपदी बाळासाहेब जगन्नाथ कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.निंबळक गावात पुन्हा सरपंच पदाची धूरा महिलेच्या खांद्यावर आली असून, लामखडे परिवारातील चौथी पिढी ग्रामपंचायत पदाचे प्रतिनिधत्व करणार आहे. दुपारी 2 वाजता सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया निंबळक ग्रामपंचायतीत पार पडली. ग्रामपंचायत सदस्यांनी गुप्त पध्दतीने बॅलेटपेपरद्वारे मतदान केले. सरपंच पदासाठी प्रियंका लामखडे व राजेंद्र कोतकर यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये प्रियंका लामखडे यांना 11 तर राजेंद्र कोतकर यांना 6 मते पडली. यामध्ये प्रियंका लामखडे यांचा 5 मतांनी विजय झाला. उपसरपंचपदासाठी बाळासाहेब कोतकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणुकीची प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी नालेगाव सर्कल राजू आंधळे, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, तलाठी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.सरपंच व उपसरपंच पदाची निवड होताच समर्थक कार्यकर्त्यांसह महिलांनी ग्रामपंचायतच्या आवारात गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी जि.प. सदस्य कालिंदी लामखडे, अजय लामखडे, केतन लामखडे, शरद ठाणगे, रमाकांत गाडे, बाळासाहेब माधव कोतकर, प्रभाकर जाधव, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शिंदे, अनिता गायकवाड, मालन रोकडे, विलासराव लामखडे, पद्मा घोलप, बाबासाहेब पगारे, सोमनाथ खांदवे, ज्योती गायकवाड, कोमल शिंदे आदींसह आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे म्हणाले की, गावातील पाण्याचा प्रश्न बिकट बनला असून, ते सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देणार आहे. एमआयडीसीसाठी गावातील ग्रामस्थांनी जमीनी दिल्या एमआयडीसीला येणार्या पाण्यावर गावातील प्रकल्पग्रस्तांचा हक्क आहे. निंबळक गटातील सर्व 13 ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे असल्याचा दावा त्यांनी केला. माजी सरपंच विलास लामखडे यांनी ग्रामस्थांनी विकासाला साथ दिली असून, काम करणार्या सदस्यांना निवडून दिले आहे. गावातील मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्य कटिबध्द राहणार असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित सरपंच प्रियंका लामखडे म्हणाल्या की, गावाच्या विकासात लामखडे परिवाराने महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. गावाचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेऊन कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment