खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावतीने सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावतीने सन्मान

 खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यावतीने सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खर्डा ः जामखेड तालुक्यातील खर्डा येथे बाल विकास जामखेड खर्डा गट आणि खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या अंगणवाडी सेविका ,मदतनीस वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार राम हवेली येथे करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरलाभाभी लददड  होते .
तसेच आर आर (आबा)पाटील सुंदर गाव म्हणून पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात आल्याने माजी सरपंच संजय गोपाळघरे यांचा सत्कार करण्यात आले .
यावेळी सरपंच नमिता गोपाळघरे यांनी भाषणात म्हणाले ग्रामपंचायत पुढील कार्यकाळ मध्ये अंगणवाडी ला अडीअडचणी येतील ते आम्ही सोडवण्याचे  सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे आश्वासन दिले.
ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी साठी येणारा दहा टक्के निधी राखीव असतो. अंगणवाडी सर्व सुविधांने परिपूर्ण असेल तर ज्ञान देण्यासाठी सोयीस्कर जाते.कारण पिढी घडवण्याचे  काम अंगणवाडी  सेविका तळमळीने करीत  असतात . प्रामुख्याने समस्य अंगणवाडी डिजिटल असावे शौचालय ,पिण्यासाठी शुद्ध पाणी ,मुलाना खेळण्यासाठी खेळणी  असे विविध विषयांवर चर्चा अंगणवाडी सेविकांनी आपल्या भाषणात बोलतांना सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेविका शामल साखरे,मनीषा परांडकर,पुष्पा मोरे ,पूजा गाडेकर ,सरस्वती लोहकरे,मदतनीस शितल जायभाय,जया पेठकर यांनी परिश्रम घेतले
यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सदस्य सह अंगणवाडी सेविका ,मदतनीस उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्थाविक संतोष थोरात व आभार  सेविका पूजा गाडेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment