हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात डस्टबिनचे वाटप सोनाली विशाल मैहेत्रे यांचा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 10, 2021

हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात डस्टबिनचे वाटप सोनाली विशाल मैहेत्रे यांचा उपक्रम

 हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात डस्टबिनचे वाटप सोनाली विशाल मैहेत्रे यांचा उपक्रम


कर्जत -
स्वच्छतेला मदत म्हणून कर्जत शहरातील शहाजीनगर, प्रभातनगर, आतार वाडा येथील महिलांसाठी सौ सोनाली विशाल मेहेत्रे यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कोरोना काळात घरात राहून कंटाळलेल्या महिलांना थोडासा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या मनोरंजनासाठी यावेळी अनिता बोरा यांनी विविध कार्यक्रमासह खेळ घेतले. यामाध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात येऊन गाणे म्हणने, अभिनय करणे, उखाणे घेणे, त्वरित प्रतिसाद देणे आदी द्वारे सर्वाना मनमोकळेपणाने सहभागाचा आनंद मिळवून दिला, याशिवाय सामाजिक भान जपत रूढी परंपराना झुगारून या कार्यक्रमात पतीचे छत्र हरपल्यानंतर ही आपल्या मुलांना शिक्षण देऊन नेटाने संसार चालवल्याबद्दल चार विधवा  महिलांचा सन्मान करण्यात आला. हळदी कुंकू म्हटले की फक्त सुवासिनी बोलावल्या जातात. म्हणून विशेष करून अशा महिलांचा सन्मान मेहेत्रे कुटुंबीयांनी करण्याचे ठरविले. त्यामध्ये श्रीमती सारिका ठोसर, आशा गोरखे, राबिया बागवान, यांना साडी देऊन व वान देऊन सन्मानित करण्यात आले.स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा या स्पर्धेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कर्जत शहरात स्वच्छतेचे काम सुरू असताना या कामाला मदत म्हणून घराघरात उपयोगी पडतील.
अशा पर्यावरणपूरक डस्टबिनचे वाण म्हणून वाटप करण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.  सौ सोनाली विशाल मेहेत्रे, सौ ऐश्वर्या सागर मेहेत्रे, यांनी महिलांचे स्वागत केले. या कार्यक्रमात स्वच्छतेचे महत्व विशद करण्यात आले व सर्वानी आपल्या घराबरोबर परिसरही स्वच्छ राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिता बोरा, सौ मंदा ढेरे, यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here