पिंपळवाडीचे सरपंचपद रिक्त राहिले असून उपसरपंचपदी सौ. रुक्मिणी रामदास जांजिरे यांची बिनविरोध निवड झाली
कर्जत - कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायत अतिशय प्रतिष्ठेची मानली जात असून ह.भ. प प्रकाश महाराज जंजिरे, महादेव बाळासाहेब जंजिरे, आप्पासाहेब हरिभाऊ जंजिरे, भाऊसाहेब मारुती गाडे व इतर मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदत्त परिवर्तन पॅनलचे नऊ पैकी ज्ञानेश्वर मोहन जंजिरे, सौ रुक्मिणी रामदास जंजिरे, सौ वैशाली दत्तात्रय जंजिरे, बिभीशन झुंबर जंजिरे, सौ गजराबाई शहाजी पोटरे, प्राजक्ता विजय पोटरे, सुभाष नागनाथ सोनवणे सात सदस्य निवडून आले, 9/2/2019 रोजी निवडणूक अधिकारी विजयकुमार बनाते, ग्रामसेवक हगारे, तलाठी ढगे भाऊसाहेब यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यामध्ये पिंपळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण राखीव महिला असे पडले होते. परंतु राखीव महिलेची जागा (उमेदवार) नसल्याने ते सरपंच पद रिक्त राहिले आहे. तर उपसरपंच पदाची निवड झाली यामध्ये उपसरपंचपदी सौ. रुक्मिणी रामदास जांजिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित ग्रामस्थांनी जल्लोष करत निवडून आलेल्या सर्व सदस्यांना व उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment