राष्ट्रीय छात्र सेनेने केली प्लास्टिक निर्मूलन जनजागृती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

राष्ट्रीय छात्र सेनेने केली प्लास्टिक निर्मूलन जनजागृती

 राष्ट्रीय छात्र सेनेने केली प्लास्टिक निर्मूलन जनजागृती


जामखेड  - 
17 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनासाठी जामखेड मध्ये प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियान राबविण्यात आले.पर्यावरण संवर्धनासाठी साठी एन सी सी च्या वतीने जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले. या वेळी प्लास्टिक निर्मूलन अभियानाचे उद्घाटन जमखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते झाले. माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली.या वेळी प्रमुख उपस्थिती,प्राचार्य हरिभाऊ ढवळे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य अविनाश फलके,एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर, अनिल देडे, मयूर भोसले, दिलीप शिंदे, रवींद्र शिंदे, दिलीप घोडके, तलाठी काळे भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी रॅली च्या माध्यमातून पर्यावरण पूरक कापडी पिशव्याचां वापर करा-प्लास्टिकचा वापर टाळा, सिंगल युज प्लास्टिक संकलन करा व नगर परिषदेत पुनर्वपरासाठी प्रक्रियेसाठी पाठवा, प्लास्टिक कचर्‍याचे वर्गीकरण करून घंटा गाडीत टाका अशी  दुकानदार,व्यापारी, ग्रामस्थ यांचे मध्ये जनजागृती केली. तसेच रस्त्याच्या वरील प्लास्टिक कचर्‍याचे योग्य विल्हेवाट लावली.या रॅलीमध्ये जामखेड महाविद्यालय, रयतचे श्री नागेश विद्यालय व ल ना होशिंग विद्यालयाचे 130 छात्र सैनिकांनी भाग घेतला. रॅलीची  सुरवात जामखेड तहसील कार्यालय,बीड कॉर्नर,जयहिंद चौक,खर्डा चौक,तपणेश्वर रोड ने  संपूर्ण जामखेड शहरात जनजागृती केली.या उपक्रमाचे कर्नल जीवन झेंडे,कर्नल विनय बाली, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड ,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी कौतुक केले.

No comments:

Post a Comment