संजय कोठारी यांच्यामुळे आज दोन वेगवेगळ्या अपघातात वाचले तिघांचे प्राण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 10, 2021

संजय कोठारी यांच्यामुळे आज दोन वेगवेगळ्या अपघातात वाचले तिघांचे प्राण

 संजय कोठारी यांच्यामुळे आज दोन वेगवेगळ्या अपघातात वाचले तिघांचे प्राण


जामखेड - 
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्यामुळे आज दोन वेगवेगळ्या अपघातात वाचले तिघांचे प्राण वालचंद नगर फोन बीड कडे जात असताना एम एच 42 क्यु  2900 स्कार्पीओ मोटार सायकलची धडक झाल्याने सौताडा येथील एचपी पेट्रोल पंपासमोर अपघात होऊन दोन जण जखमी झाले अनिकेत रणमोडे वय 30 इंदापुरजि. पुणे सूर्यकांत तेलगे वय 55 इंदापुर जि. पुणे हे दोघे गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते यांनी रुग्णवाहिका पाठवून त्यांना दवाखान्यात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले तसेच सायंकाळी आठ वाजता चिंचपूर हद्दीमध्ये गौरी हॉटेल समोर टि. व्हि. एस. एक्सल 100 मोटर सायकल क्र.  एम. एच. 45ए.  झेड. 7701 अज्ञात चारचाकी वाहनाची धडक होऊन त्यामध्ये एक 60 वर्षीय इसम जखमी झालेला आहे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही तो जामखेड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे यास पण सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आणून त्याचे प्राण वाचवले. या अपघातातील जखमींना संजय सानप, हनु शिंदे सौताडा ,हरिदास गळगटे आष्टा यांनी मदत केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here