स्मार्ट व्हिलेज अभियानांतर्गत गुंडेगाव येथे मोफत नेत्रतपासणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

स्मार्ट व्हिलेज अभियानांतर्गत गुंडेगाव येथे मोफत नेत्रतपासणी

 स्मार्ट व्हिलेज अभियानांतर्गत गुंडेगाव येथे मोफत नेत्रतपासणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः आनंदॠषिजी नेत्रालय नगर व स्मार्ट व्हिलेज अभियान गुंडेगाव यांच्या संयुक्त  विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच गुंडेगाव येथे आयोजित केले होते.
ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्य च्या द्रुष्टीने हे शिबीर वरदान ठरले आसून गुंडेगावातील अनेक ग्रामस्थांनी डोळे तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले असून मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया मोफत करण्यात आले आहे यामध्ये अनेक वृध्द लोकांनी सहभाग नोंदवला व शंभराहून अनेक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे आयोजन स्वप्निल गव्हाणे व आर्यन कराळे याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात  आले याप्रसंगी  गुंडेगावचे माजी उपसंरपच मंगेश हराळ याच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पत्रकार संजय भापकर, सतिश काका चौधरी, एकनाथ कासार, भवानी प्रसाद चुंबळकर मेजर, डॉ.विलास सकट, शेखर हराळ, तुकाराम भापकर, रामकृष्ण कुताळ, शिर्के, रामदास जावळे  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment