भारतीय जनता पार्टी केडगाव मंडलाची बुथ संघटन बैठक संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

भारतीय जनता पार्टी केडगाव मंडलाची बुथ संघटन बैठक संपन्न

 भारतीय जनता पार्टी केडगाव मंडलाची बुथ संघटन बैठक संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतीय जनता पार्टी केडगाव मंडलाची बुथ  संघटन बैठक संपन्न झाली. यावेळी शहर प्रभारी मनोजजी पांगारकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. सविस्तर  बुथ  रचना संघटन या विषयावर चर्चा केली.यावेळी बोलताना शहर जिल्हा अध्यक्ष भैय्या गंधे यांनी केडगाव मंडलाचे काम चांगले सुरू आहे असे सांगितले. यावेळी बोलताना केडगाव  मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार यांनी केडगाव मंडलात केलेल्या कामांची माहिती दिली. कोरोना काळात किराणा वाटप , कोविड सेंटरला फळे वाटप , दूध दरवाढ आंदोलन आदी बाबत माहिती दिली. मोदीजींचे पत्रके वाटप , घंटानाद आंदोलन , महाराष्ट्र बचाओ आंदोलन इत्यादी आंदोलने केली असे सांगितले. तसेच वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविले असे सांगितले. त्याचप्रमाणे विकासात्मक कार्यक्रमात नगर-पुणे रस्त्यावर वारंवार होणार्‍या अपघातांबाबत सार्वजनिक बांधकाम निवेदन , नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करणेबाबत मा. खासदार सुजयजी विखे यांना निवेदन , तसेच करोना काळात केडगाव मध्ये वारंवार वीज खंडीत होणेबाबत निवेदन दिले असे सांगितले.*
यावेळी केडगाव मंडलातील . श्री. पंकज जहागिरदार (केडगाव मंडल अध्यक्ष), विवेक नाईक (संघटन सरचिटणीस, मंडल प्रभारी), संतोष गांधी, तुषार पोटे (सरचिटणीस), श्री. धंनजय जामगावकर (शहर उपाध्यक्ष), श्री. सुनिल कुलकर्णी ( केडगाव मंडल चिटणीस) श्री अ‍ॅड. चंदन बारटक्के (केडगाव मंडल संघटन सरचिटणीस), श्री राहुल कांबळे (नगरसेवक म.न.पा), श्री जग्गनाथ निंबाळकर (शहर उपाध्यक्ष), सौ.लताताई शेळके (सभापती), सौ.संध्या पावशे (केडगाव मंडल महिला अध्यक्ष), सौ.रेखा मैड (केडगाव मंडल महिला उपाध्यक्षा), सौ. सुधा लाटे (केडगाव मंडल संस्कृतिक व आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष), सौ. लता डेंगळे ( केडगाव मंडल महिला मोर्चा सरचिटणीस), श्री.अभय भळगट (केडगाव मंडल व्यापारी आघाडी अध्यक्ष), श्री.अरूण नरवडे( केडगाव मंडल अनु.जाती मोर्चा अध्यक्ष), श्री.भाऊसाहेब टांगळ (केडगाव मंडल अनु.जाती मोर्चा उपाध्यक्ष), श्री.सुभाष गेनाप्पा (विमुक्त भटक्या जमाती अध्यक्ष केडगाव मंडल), श्री.राजेंद्र सातपुते (शहर जिल्हा उपाध्यक्ष भा. ज.प.युमो.), श्री. अजीत कोतकर (कार्या लयीन प्रमुख भा. ज.प.यु. मो.), श्री. मंगेश खंगले (केडगाव मंडल युवामोर्चा अध्यक्ष), श्री. सागर कटारिया (केडगाव मंडल युवामोर्चा सरचिटणीस), श्री. उत्कर्ष कुलकर्णी, श्री.लक्ष्मीकांत क्षीरसागर, श्री. विनायक पावसे, श्री. मितेश पवार, श्री. चिराग शाह, श्री. चंद्रकांत पाटोले, श्री. मिनानाथ मैड, श्री. कार्तिक तगारे

No comments:

Post a Comment