अकोला तालुक्यात राम मंदिर निर्माण निधीस उत्स्फुर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

अकोला तालुक्यात राम मंदिर निर्माण निधीस उत्स्फुर्त प्रतिसाद

 अकोला तालुक्यात राम मंदिर निर्माण निधीस उत्स्फुर्त प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अकोला ः अहो, महाराज माझे पैसे घ्याना राम मंदिरासाठी अशी हाक मारून 101 रुपया देणारी हातावर पोट असणार्‍या कहार समाजाचे महिलेचे देणगी तर माझ्या वडिलांनची राम मंदिर निर्माणची इच्छा पूर्ण होते म्हणून एक हजार रुपये देणारा न्हावी समाजातील देणगीदारांची देणगी स्वीकारताना खरा आनंद वाटला.
तालुक्यातील कळस बु॥ येथे प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनाचे काम कळस येथे हभप विष्णू महाराज वाकचौरे, देवा महाराज वाकचौरे, गणेश महाराज वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, केरू वाकचौरे, सिताराम वाकचौरे, शांताराम वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे हे करीत होते. गावातील वर्गणी जमा करीत असताना कहार समाजाची भाजीपाला विकून गुजराण करणारी महिला, गरीब परिस्थिती असल्याने तिच्या कडे कोणीही वर्गणी मागितली नाही. पण तिची देवावर असलेली श्रध्दा अन राम मंदिरासाठी आपली पण देणगी दिली पाहिजे यामुळे तिने गावातील वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक विष्णू महाराज यांना हाक मारून अहो महाराज, माझी वर्गणी घ्या राम मंदिराला, माझी देणगी मंदिराला गेली पाहिजे अशी विनंती केली. ही देणगी स्वीकारताना मनाला समाधान वाटले .
न्हावी समाजाचा गरीब कुटुंबातील माधव कोल्हाळ याने राम मंदिर निर्माणासाठी 1 हजार ची देणगी  देता ना सांगितले की आमचा खारीचा वाटा मंदिरासाठी आहे. तो तुम्ही घ्यावा. माझे वडील राम मंदिर निर्माण व्हावे म्हणून काम करायचे ते आता हयात नाही पण त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. मनाला आनंद झाला आहे. प्रकाश वाजे हा ठाकर समाजातील, श्रीमती मंगल गवळी परीट  तर श्रीमती  संगिता शिर्के या गुरव समाजातील महिलांनी सुध्दा बोलावून देणगी राममंदिर निर्माण साठी दिली. त्यांच्या श्रद्धेतून हे राम मंदिर निर्माण होत आहे. देणगी दिल्यावर भाविक मोठया प्रेमाने श्रीरामाचा गजर करीत होते. खरच टाटा- बिर्ला किंवा आंबनी राम मंदिर उभारू शकले असते पण आपला खारीचा वाटा असावा असा प्रत्येक भाविकांचा मनोदय यातून दिसून आला.

No comments:

Post a Comment