पंतप्रधानांकडून शिवजयंतीनिमित्त खास व्हिडीओ शेअर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

पंतप्रधानांकडून शिवजयंतीनिमित्त खास व्हिडीओ शेअर

 पंतप्रधानांकडून शिवजयंतीनिमित्त खास व्हिडीओ शेअर


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवरायांवरील भाषणाचा एक आपला जुना व्हिडीओ शेअर केला आहे. दुसरे ’शिवाजी’ कोणी होऊ शकत नाही पण ’सेवाजी’ मात्र होऊ शकतो असं सांगत सेवेचे महत्व व्हिडिओच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले की, भारत मातेचे सुपुत्र छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त नमन. त्यांचे साहस, अद्भुत शौर्य आणि असाधारण बुद्धीमत्ता अनेक युगे देशवासियांना प्रेरित करतील.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.शौर्य, साहस आणि पराक्रमाचे प्रतिक असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा असे राहुल गांधींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यातील आणि देशातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय की, ’जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

No comments:

Post a Comment