सरसेनापती ‘हंबीरराव’ सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांचा फर्स्ट लूक प्रदर्शित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

सरसेनापती ‘हंबीरराव’ सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांचा फर्स्ट लूक प्रदर्शित

 सरसेनापती ‘हंबीरराव’ सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांचा फर्स्ट लूक प्रदर्शित


मुंबई ः
चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांसमोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ’प्रवीण तरडे’ पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन आले आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे ’हंबीरराव मोहिते’ यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या ’सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आणणार आहेत. दरम्यान, आज (दि. 19) शिवजयंतीच्या पावन दिनी ’हंबीरराव मोहिते’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment