अनुभवी डॉक्टर्स, उच्च व आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना समाधान! - आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

अनुभवी डॉक्टर्स, उच्च व आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना समाधान! - आ. संग्राम जगताप

 अनुभवी डॉक्टर्स, उच्च व आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना समाधान! - आ. संग्राम जगताप

“साईदीप हॉस्पिटल”चे तिसर्‍या वर्षात पदार्पण..
अचूक निदान व योग्य उपचार या मुळे आरोग्य सेवा देताना आनंद होतो. यापुढे कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचे निदान वेळेत आणि खात्रीशीर करता येईल कारण आता कृत्रिम बुद्धिमत्ता ची जोड़ मिळणार आहे. भविष्यात साईदीप हॉस्पिटलचे अनेक विभाग व त्यांचा विस्तारही होणार आहे. माझे सर्व सहकारी डॉक्टर्स यांची बहुमूल्य साथ लाभल्याने आम्ही हे करु शकलो.
 - डॉ. दीपक, साईदीप हॉस्पिटल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सामान्य रुग्ण याना केंद्रबिंदू मानून उच्च प्रतीच्या आरोग्य सेवा, ज्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोज यामुळे अत्यंत कमी कालावधीत साईदीप हॉस्पिटल नावारूपास आले. अनुभवी डॉक्टर्स, उच्च व आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा सुविधा यामुळे कोरोना काळातही साईदीप हॉस्पिटल ने अहोरात्र सेवा दिल्या. मी अनेक पेशंटना भेटण्यासाठी येथे येतो. मला जाणवले की अचूक निदान आणि योग्य उपचार, स्वच्छता, खासकरून पेशंटचे नातेवाईक यांच्यासाठी वेटिंग एरिया, विनामूल्य भोजन, अश्या अनेक सुविधा येथे असल्यामुळे लोक आता पुणे किंवा इतर मोठ्या शहरात न जाता नगरमध्येच साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. दोन वर्ष पूर्ण करून तिसर्‍या वर्षात पदार्पणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.
उच्च प्रतीच्या आरोग्य सेवा प्रामाणिकपणे उपलब्ध करून सामान्य रुग्ण यांना केंद्रबिंदू मानून अविरत सेवा उपलब्ध केल्यामुळे केवळ दोन वर्षात साईदीप हॉस्पिटल जिल्ह्यासह राज्यात नावारूपास आले, असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजेंस) या राज्यातील प्रथमच येथे वापरण्यात येणार्‍या निदान प्रणाली मुळे कॅन्सर, हृदयरोग, स्त्रीरोग व डोळ्यांचे आजार होण्यापूर्वी तपासणीद्वारे संकेत मिळाल्याने उपचार करणे सोपे होऊन मोठा खर्च व वेळ वाचेल अशी मला खात्री आहे. साईदीप हॉस्पिटल मध्ये असंख्य स्थानिक  कुटुंबाना येथे रोजगार उपलब्ध झाल्याने डॉक्टर दीपक व त्यांचे सर्व सहकारी संचालक यांनी खूप महत्वाचे कार्य केले आहे असे ते म्हणाले.
या वेळी बोलताना महापौर वाकळे यानी नगरमध्ये साईदीप हॉस्पिटलची सुंदर, रुबाबदार इमारत आहे. स्वच्छतेबाबत येथे सर्व काळजी घेतली जाते व पेशंट साठी सर्व आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने नगरचे नागरिक समाधानी आहेत असे ते म्हणाले.
यावेळी डॉ आर आर धूत यांनीही अनेक विषयांवर आपले विचार व्यक्त केले,  पूर्ण वेळ कॅन्सर विभागाचे आ. जगताप व डॉ श्रीधर बधे, हृदयरोगतज्ञ यांच्या बाह्यरुग्ण विभागाचे, महापौर वाकळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ कैलाश झालानी यांनी केले. सूत्र संचालन डॉ पायल धूत यांनी व डॉ एस एम इकबाल यांनी आभार व्यक्त केले. या वेळी डॉ.आर.आर. धूत, डॉ. निसार शेख, डॉ. कैलाश झालानी, डॉ.रवीन्द्र सोमाणी, डॉ. व्ही. एन. देशपांडे, डॉ. श्यामसुंदर केकड़े, डॉ.अनिल कुर्‍हाडे, डॉ. हरमीत कथुरिया, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. एस. एम. इकबाल तसेच डॉ. किरण दीपक, डॉ. राहुल धूत, डॉ.वैशाली किरण, डॉ.अश्विन झालानी,डॉ. अनिकेत कुर्‍हाडे, डॉ. कस्तूरी कुर्‍हाडे, डॉ.गणेश सारड़ा, डॉ. रोहित धूत,डॉ. भूषण खर्चे, डॉ. श्रीधर बधे, डॉ. संगीता धूत, डॉ. पायल धूत, डॉ. शिरीष कुलकर्णी, सौ ज्योती दीपक, सौ शोभा धूत ,सौ अनिता झालानी,सौ नंदा सोमाणी, सौ वसुधा देशपांडे, सौ अंजू कथुरिया, सौ रोहिणी कुर्‍हाडे,सौ सीमा इकबाल, सौ पृथा खर्चे, डॉ मानसी बधे व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here