अ‍ॅमेझॉनची सेलर रजिस्ट्रेशन आणि अकाऊंट मॅनेजमेंट सेवा आता मराठीतही उपलब्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

अ‍ॅमेझॉनची सेलर रजिस्ट्रेशन आणि अकाऊंट मॅनेजमेंट सेवा आता मराठीतही उपलब्ध

 अ‍ॅमेझॉनची सेलर रजिस्ट्रेशन आणि अकाऊंट मॅनेजमेंट सेवा आता मराठीतही उपलब्ध

बेंगळुरू, 14 फेब्रुवारी 2021 : विक्रेत्यांना आता अ‍ॅमेझॉन डॉट इन  बाजारपेठेमध्ये आपले नाव नोंदविण्याचे आणि आपला ऑनलाइन बिझनेस सांभाळण्याचे काम मराठीतून करता येईल अशी घोषणा अ‍ॅमेझॉनने आज केली. मराठी भाषेच्या आगमनामुळे महाराष्ट्रातील लाखो भारतीय उद्योजक, एमएसएमई, स्थानिक दुकाने आणि किरकोळ विक्रेत्यांना भाषेचा अडथळा पार करत ई-कॉमर्सचा फायदा घेता येणार आहे. विक्रेता नोंदणी अर्थात सेलर रजिस्ट्रेशन आणि अकाउंट मॅनेजमेंट सेवा मराठीमध्ये उपलब्ध झाल्याने 85,000 हून अधिक विद्यमान अ‍ॅमेझॉन सेलर्स आणि  महाराष्ट्रातील  कोल्हापूर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, जळगाव यांसारख्या टियर-1 व त्याखालील श्रेणींमधील शहरांतील लाखो नव्या विक्रेत्यांना फायदा होणार आहे.
अ‍ॅमेझॉन परिवाराचा भाग होण्यासाठी एखाद्या विक्रेत्याला लागणार्‍या प्रत्येक गोष्टीचा या सुविधेमध्ये समावेश आहे- अ‍ॅमेझॉन विक्रेता म्हणून पहिल्यांदाच नावनोंदणी करण्यापासून ते ऑर्डर्सचे व्यवस्थापन करण्यापर्यंत ते उपलब्ध मालाच्या सूचीचे व्यवस्थापन करण्यापर्यंत आणि आपल्या कामगिरीच्या आकडेवारीचे मूल्यमापन करण्यापर्यंत सर्व सुविधा त्यांना आपल्या सोयीच्या भाषेमध्ये उपलब्ध होणार आहेत. हा अनुभव अ‍ॅमेझॉन सेलर वेबसाइट तसेच मोबाइल अ‍ॅपवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे. याखेरीज अ‍ॅमेझॉनकडून सेलर सपोर्ट सेवा आणि सेलर युनिव्हर्सिटी व्हिडिओज व ट्यूटोरियल्ससुद्धा मराठीतून पुरवली जाणार आहेत.
अ‍ॅमेझॉन च्या एमएसएमई अँड सेलर पार्टनर एक्स्पीरियन्स विभागाचे डायरेक्टर प्रणव भसीन म्हणाले की, भारतीय एमएसएमईंना आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी ई-कॉमर्सचा फायदा घेताना जाणवणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भाषा. अधिकाधिक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना ई-कॉमर्सच्या क्षेत्रात येण्यासाठी सक्षम बनविताना आम्ही आमच्या स्थानिक भाषांतील, व्हॉइस आणि व्हिडिओज चे पाठबळ असलेल्या उपक्रमांना अधिक भक्कम बनविण्यासाठी बांधिल आहोत. आणि 2025 पर्यंत 1 कोटी एमएमएमईंना डिजिटाइझ करण्याच्या आमच्या प्रतिज्ञेबरहुकुम उचलले गेले आहे.
अ‍ॅमेझॉन सेलर्स आता अ‍ॅमेझॉन सेलर वेबसाइट आणि सेलर मोबाइल अ‍ॅपवरील काही मोजक्या सोप्या स्टेप्स वापरून आपली प्रीफर्ड लँग्वेज किंवा पसंतीची भाषा बदलू शकतात. अधिकाधिक मराठी वैशिष्ट्यांचा वापर करत हा अनुभव अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न अ‍ॅमेझॉन सातत्याने करत राहील व त्यायोगे हजारो एसएमबींना आपला व्यवसाय आपल्या भाषेतून रजिस्टर करण्याचे आणि सांभाळण्याचे फायदे अनुभवता येतील. ग्राहक आणि व्यावसायिक दोहोंनाही ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये अधिक व्यापक संधी मिळाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून अ‍ॅमेझॉन इंडिया स्थानिक भाषा, व्हाइस अँड व्हीडिओ यंत्रणांनी सुसज्ज उपक्रमांच्या क्षेत्रांमध्ये नवनवे प्रयोग करत आहे. यूजर्सना व्हॉइस कमांड्सचा वापर करून खरेदी करता यावी यासाठी मार्च 2020 मध्ये अँड्रॉइड डिव्हाइसेससाठीच्या अ‍ॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅपसाठी अ‍ॅलेक्झा वापरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा ही एको या स्मार्ट स्पीकर्ससाठीची क्लाउड-बेस्ड सेवा हिंदी, मराठी, गुजराती, कन्नड, बंगाली, तामीळ, तेलगू इत्यादी वेगवेगळ्या भाषांतील विशेष नामे ओळखते. अ‍ॅलेक्सा हिंदी सुरू झाल्याने आता ग्राहक अ‍ॅलेक्साशी फक्त इंग्रजीतूनच नव्हे तर हिंदी किंवा हिंग्लिशमधूनही संवाद साधू शकतात, आपले प्रश्न विचारू शकतात.

No comments:

Post a Comment