पतसंस्थेच्या उपक्रमांद्वारे सभासदांना सक्षम करण्याचा प्रयत्न - अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

पतसंस्थेच्या उपक्रमांद्वारे सभासदांना सक्षम करण्याचा प्रयत्न - अविनाश घुले

 पतसंस्थेच्या उपक्रमांद्वारे सभासदांना सक्षम करण्याचा प्रयत्न - अविनाश घुले  

स्व.शंकरराव घुले माथाडी कामगारांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हमाल-मापाड्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेने नेहमीच पुढकार घेऊन ते सोडविले आहेत. हमाल-मापड्यांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी स्व.शंकरराव घुले यांनी पतसंस्थेची स्थापना करुन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. संचालक मंडळ, सभासदांच्या सहकार्याने पतसंस्था प्रगतीपथावर आहे. हमाल-मापाड्यांना गरजेवेळी तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध होत असल्याने त्यांच्या गरजाही पूर्ण होत आहेत. पतसंस्थेच्यावतीने सभासदांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना आर्थिक बाबत सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सभासदांनीही वेळेत कर्जफेड करुन संस्थेचा लौकिक टिकून ठेवावा. गेल्या वर्षी कोरोना काळात हमाल-मापाड्यांवर जे संकट आले होते, त्यावेळी सर्वांच्या सहकार्याने यावर आपण मात करु शकलो, असे प्रतिपादन हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
स्व.शंकरराव घुले माथाडी कामगारांची सहकारी पतसंस्थेचे वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना अविनाश घुले बोलत होते. यावेळी चेअरमन बबन अजबे, व्हाईस चेअरमन नारायण गिते, सचिव संजय महापुरे, संचालक सचिन ठुबे, सचिन करपे, जालिंदर नरवडे, दिगंबर सोनवणे, बाळासाहेब म्हसे, केरबा पोळ, नवनाथ लोंढे, आशाबाई रोकडे, रत्नाबाई आजबे आदिंसह गोविंदराव सांगळे, सतीश शेळके, भैरु कोतकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी चेअरमन बबन आजबे म्हणाले, पतसंस्थेने नेहमीच हमाल-मापडी यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करुन त्यांची आर्थिक बाजू सक्षमपणे सांभाळली आहे. पतसंस्थेतून देण्यात येणार्या सुविधांमुळे सभासदांचे गरज तर भागविली जातेच त्याचबरोबर जमा-पुंजीही सुरक्षित होत असल्याने एक आर्थिकस्थैर्य सभासदांना मिळत आहे.  संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्याने पतसंस्थेचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु आहे. पुढील काळात सभासदांच्या हितांचे निर्णय  पतसंस्थेच्या माध्यमातून घेऊन ती सक्षम करण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्य करु, असे सांगून पतसंस्थेचा ताळेबंद सभासदांसमोर सादर केला. हाईस चेअरमन नारायण गिते यांनी गेल्या वर्षभरात पतसंस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संजय महापुरे यांनी केले तर आभार सचिन ठुबे यांनी मानले. यावेळी रविंद्र भोसले, गुंजाळ, रामा पानसंबळ, अशोक जायभाय, किसन सानप, ढाकणे आदिंसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सभासद उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पतसंस्थेच्यावतीने गौरव करण्यात आला.

No comments:

Post a Comment