फिरोदिया प्रशालेचे विद्यार्थी 1971च्या युद्धातील शस्त्रास्त्रे पाहून भारावले ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

फिरोदिया प्रशालेचे विद्यार्थी 1971च्या युद्धातील शस्त्रास्त्रे पाहून भारावले !

 फिरोदिया प्रशालेचे विद्यार्थी 1971च्या युद्धातील शस्त्रास्त्रे पाहून भारावले !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सन 1971 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले, यात भारताने ऐतिहासिक विजय मिळविला. या अभिमास्पद घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली. म्हणून एम.आय.आर.सी.मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नगरमधील शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशालेतील विद्यार्थी, संस्थेचे व्हाईस चेअरमन दशरथ खोसे, सचिव र.धोंं.कासवा, मुख्याध्यापिका सौ.योगिता गांधी, विनोद कटारिया आदिंसह शिक्षकवृंद यांनी एमआयआरसील भेट दिली.
या क्षेत्रभेट अंतर्गत या सैनिक कॅम्पला ही भेट देण्यात आली. यावेळी लेफ्टनंट कर्नल नवीन मसीह यांनी  1971 साली झालेल्या युद्धात वापरण्यात आलेल्या रणगाड्यासह मशिनगन, रायफल्स, रडार, लॉन्चर यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना जवानांचे महत्व, देशसेवा, देशप्रेम याविषयी प्रेरणादायक माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना 1971 मधील युद्धावरील शॉर्ट फिल्मही दाखविण्यात आली. लष्करी बॅण्ड पथकाने देशभक्तीपर गीत वाजवून प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. यावेळी सुभेदार मेजर एस.डी. बुरहान उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी प्रत्यक्ष युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रे, रणगाडे व युद्ध साहित्य पाहून हरकून गेले. लष्करी जवान व त्यांचे कार्याची महत्वपूर्ण माहिती मिळाल्याने त्यांच्यातील देशप्रेमात आणखी भर पडली. तसेच जवानांविषयी आदर निर्माण झाला.


No comments:

Post a Comment