अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमात ‘प्रगत कला’चे यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमात ‘प्रगत कला’चे यश

 अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमात ‘प्रगत कला’चे यश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर अंतर्गत शासनाच्या दोन वर्षीय अ‍ॅनिमेशन अभ्यासक्रमाची मान्यता असलेल्या प्रगत कला महाविद्यालयातील प्रथम बॅच निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये राजेश चव्हाण हा प्रथम आला तर  अक्षदा शेळके व आशिष चांदेकर हे विद्यार्थी प्रथम श्रेणित आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य नुरील भोसले, सुरज आल्हाट आदिंचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष बिशप प्रदीप कांबळे, सचिव अ‍ॅड.विनायक पंडित, विश्वस्त जॉन प्रभाकर, बॅसिल काळसेकर  व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी प्राचार्य नुरील भोसले म्हणाले, प्रगतकला महाविद्यालय ही शासनमान्य अनुदानित कला संस्था 1966 सालापासून कला अध्यापनाचे काम करत असून, नवोदित कलाकारांसाठी अद्यावत कला शिक्षण प्रणालीचे उच्च शिक्षण देत आहे. येथे फौंडेशन, ए.टी.डी.अ‍ॅनिमेशन, कमर्शिअल आर्ट, फोटोग्राफी हे अभ्यासक्रम कला संचलनालय मुंबई व व्होकेशनल ट्रेनिंग महाराष्ट्र बोर्ड यांच्या अंतर्गत राबविले जात आहेत. या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठा उपयोग होत असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment