श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त महापद्मसेनाच्यावतीने 44 युवकांचे रक्तदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त महापद्मसेनाच्यावतीने 44 युवकांचे रक्तदान

 श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त महापद्मसेनाच्यावतीने 44 युवकांचे रक्तदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त व श्री मार्कंडेय मंदिर शतक महोत्सवी वर्षानिमित्त महापद्मसेनाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 44 युवकांनी रक्तदान करुन श्री मार्कंडेय जयंती साजरी केली. यावेळी समाजातील विविध भागातील तरुणांनी या शिबीरात भाग घेतला. कोरोना या महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक संकटांना सामोरे जाताना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहे. अशा या काळात सामाजिक बांधिलकी जपत महापद्मसेनाच्या वतीने हे शिबीर घेण्यात आले.श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त महापद्मसेनाच्या वतीने गांधी मैदानी येथील मार्कंडेय मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवान श्री मार्कंडेय यांची आरती करुन या शिबीराची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांसह महापद्मसेनेचे सेवक यावेळी उपस्थित होते.
यावेळी महापद्मसेनेच्या वतीने विविध उपक्रमांची माहिती देतांना विनोद बोगा म्हणाले, समाजिक उपक्रम राबवुन  समाजातील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज नगर शहरातील ऐतिहासिक असे श्री मार्कंडेय समाज मंदिर आहे. त्या मंदिराची दुरावस्था झाली असून त्यासाठी महापद्मसेने च्यावतीने मंदिर जिर्णोध्दार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून त्यांना जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या शिबीरास जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर यांचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वीतेसाठी महापद्म सेवकांनी परिश्रम घेतले. यावेळी नगरातील विविध भागात महापद्म सेवकांनी श्री मार्कंडेय जयंती साजरी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here