शिवरायांना स्वराज्य महत्वाचे होते ः प्रा. सलाम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

शिवरायांना स्वराज्य महत्वाचे होते ः प्रा. सलाम

 शिवरायांना स्वराज्य महत्वाचे होते ः प्रा. सलाम

मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्यावतीने शिवजयंती साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शिवाजी महाराजांनी मुस्लिमांना आपल्या सेवेत घेतले होते. कुठल्याही मुस्लिम दर्ग्याला अथवा मशिदीला त्यांनी कधीही हानी पोहचविली नाही. शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मुस्लिम शासकांच्या बाजूने लढणारे अनेक मराठा सरदार होते, हेही आपणास विसरता येणार नाही. तो संघर्ष हा धार्मिक स्वरुपाचा नव्हताच तर तो राजकीय स्वरुपाचा होता. शिवरायांना धर्मापेक्षा स्वराज्य महत्वाचे होते.  सर्वांना आपआपल्या धर्माप्रमाणे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य होते, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ.प्रा.अब्दुस सलाम सर यांनी केले.
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्या मदर तेरेसा उर्दू ज्युनिअर कॉलेज, मासुमियाँ डि.टी.एड्. व बी.एड्. कॉलेज, मौलाना आझाद हायस्कूल व सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळेमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुस सलाम बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका फरहाना सय्यद, शेख इनायतुल्ला, सईद शेख, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान आदि उपस्थित होते.
याप्रसंगी कोरोना, सॅनिटायर, सुरक्षित अंतर, मास्क या विषयी जागृतीपर संदेश देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment