1मार्च पासून दूध होणार 100 रुपये लिटर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

1मार्च पासून दूध होणार 100 रुपये लिटर

 1मार्च पासून दूध होणार 100 रुपये लिटर



नगरी दवंडी

अहमदनगर- दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू असून, ते आणखी तीव्र करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी भारतीय किसान युनियन महापंचायतींचे आयोजन करत आहे.


विरोध आणखी तीव्र व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयांचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या भारतीय किसान युनियनने कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे.

या महासंघाचे जिल्हाध्यक्ष मलकीत सिंह यांनी म्हटलंय की 1 मार्चपासून दूध उत्पादक शेतकरी हे दुधाच्या किंमती वाढवणार आहेत.

50 रुपये लिटर दराने विकले जाणारे दूध आता 100 रुपये लिटर दराने विकले जाईल असे ते म्हणाले आहेत.मलकीत सिंह यांचं म्हणणं आहे की डिझेलचे दर वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावर शेतकऱ्यांनी दूध दरवाढीचा तोडगा काढला असून यापुढेही सरकारने ऐकले नाही तर भाज्यांचेही दर वाढवण्यात येतील असा इशारा सिंह यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment