नगर शहरात खंडणी खोरांचा सुळसुळाट, व्यवसायिकांची न्यायालयात धाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 26, 2021

नगर शहरात खंडणी खोरांचा सुळसुळाट, व्यवसायिकांची न्यायालयात धाव

 नगर शहरात खंडणी खोरांचा सुळसुळाट, व्यवसायिकांची न्यायालयात धाव


नगरी दवंडी

अहमदनगर - अहमदनगर शहरात सध्या खंडणीखोर यांची दहशत वाढली आहे. या दहशतीमुळे व्यवसायिक वर्गामध्ये घबराटीचे वातावरण असून खंडणीखोर व्यवसायिकांना दिवसाढवळ्या लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करत आहे. अहमदनगर शहरातील प्रॉपर्टी व्यावसायिक अरबाज सय्यद यांना नुकताच खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे.

नासिर गनी खान उर्फ (चंकी दादा) व कदीर गनी खान उर्फ (वडा भाई) या दोघांनी अरबाज सय्यद यांना पाच लाखा रुपयांची खंडणी मागितली असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. नासिर गणी खान व कदीर गनी खान या दोघांविरोधात अहमदनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र या दोघांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. सदर गुंड प्रवृत्तीच्या दोघांनी अरबाज सय्यद हे महानगरपालिकेत कामानिमित्त गेले असता, त्यांना तेथे गाठून तु आम्हाला पाच लाख रुपये दे नाहीतर तुला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटने संदर्भात प्रॉपर्टी व्यवसायिक अरबाज सय्यद यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोतवाली पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी अरबाज सय्यद यांची कुठलीही तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर अरबाज सय्यद यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सदर घटने संदर्भात माहिती दिली मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांनीही या घटनेसंदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेवटी अरबाज सय्यद यांना न्यायालयाचे दार ठोठावले लागले. या घटने संदर्भात न्यायालयाने नासिर खान उर्फ चंकी दादा व कदीर खान उर्फ वडा भाई या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपींना या संदर्भात पोलीस प्रशासन आता काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here