वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधील भ्रष्टाचारी नोंदी रद्द करण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधील भ्रष्टाचारी नोंदी रद्द करण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण

 वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधील भ्रष्टाचारी नोंदी रद्द करण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील बन्सी शिवराम उजागरे यांच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेत त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये भ्रष्टाचार झाल्याबद्दल त्यांनी अनेकदा तहसील कार्यालयाकडे याबद्दल दाद मागितली असता त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याने दि.26 जानेवारी पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयात आमरण उपोषणास बसले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी राहणारे बन्सी शिवराम उजागरे यांचे वडील शिवराम शंकर उजागरे यांचे दिनांक 14 एप्रिल 1985 साली निधन झाले. वडिलांचे निधन झाल्या नंतर उजागरे हे पुणे या ठिकाणी पोट भरण्यासाठी गेले होते. 90 साली गावी आल्यानंतर त्यांना थोडेफार गवंडीकाम शिकल्यामुळे शेतीचे काम करून गवंडी काम करत होते. मात्र 1995 मध्ये मयत भावाच्या मुलाच्या तक्रारीवरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. भावाचा मुलगा विनोद उजागरे हा वकिलाचा क्लर्क असल्यामुळे वकिलांच्या सल्ल्याने त्याने त्यांची आई रमाबाई घरी एकटीच असल्यामुळे व ती अशिक्षित असल्यामुळे तिचा फायदा घेऊन याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या शेतीच्या बोगस नोंदी लावण्यात आल्या. तसेच घरातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली आहेत.विनोद याने प्रॉपर्टी हडप करण्यासाठी बहिणीला देखील मयत घोषित केले आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असून याप्रकरणी अनेकदा तहसील कार्यालयाकडे याबद्दल दाद मागितली असता त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसून वडील शिवा उर्फ शिवराम शंकर उजागरे यांच्या प्रॉपर्टी मधील भ्रष्टाचार नोंदी रद्द होऊन पुन्हा त्यांच्या वडिलांच्या नावाने प्रॉपर्टी घेऊन वारसाहक्काने त्यांची आई रंभा, शिवराम आणि कांता एकनाथ शिंदे यांचा अधिकार असून प्रामाणिकपणे त्यांच्या नोंदी लावण्यात याव्या यासाठी बन्सी शिवराम उजागरे दि.26 जानेवारी पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयात आमरण उपोषणास बसले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here