मकर संक्रांतीनिमित्ताने प्रियदर्शनी महिला प्रतिष्ठानच्यावतीने हळदी कुंकू व पैठणीचा खेळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

मकर संक्रांतीनिमित्ताने प्रियदर्शनी महिला प्रतिष्ठानच्यावतीने हळदी कुंकू व पैठणीचा खेळ

 दीपाली माने यांनी पटकावली पैठणी

मकर संक्रांतीनिमित्ताने प्रियदर्शनी महिला प्रतिष्ठानच्यावतीने हळदी कुंकू व पैठणीचा खेळ


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड शहरात मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने प्रियदर्शनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम व खेळ पैठणीचा कार्यक्रम अयोजीत करण्यात आला होता या कार्यक्रमात दिपाली माने या महिलेने स्पर्धा जिंकून पैठणीची मानकरी ठरली. या कार्यक्रमास मोठया प्रमाणावर महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला
   आपल्या भारतीय संस्कृती नुसार मकर संक्रांती निमित्त भव्य हळदी कुंकू समारंभ व होममिनिस्टरची मानाची पैठणी असा मराठमोळा कार्यक्रम आपल्या खास माता बहिणींसाठी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस चे कार्यकारी अध्यक्ष राहुल उगले व प्रियदर्शनी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ताताई आदित्य उगले व काँगेस पक्ष जामखेड यांनी वार्ड क्रं 6 मध्ये आयोजित केला होता.
   यावेळी बोलताना जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल उगले म्हणाले, कोरोना काळात महिलांची घरगुती कामामुळे झालेली कोंडी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस व प्रियदर्शनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने हळदी कुंकू व खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला आहे. पैठणी  निमित्त आहे या खेळात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या मनातील वाट मोकळी केली यापुढील काळात महिलांचे असेच कार्यक्रम घेऊन उत्साह वाढवणार असल्याचे राहुल उगले यांनी सांगितले.
   प्रियदर्शनी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ताताई आदित्य उगले म्हणाले, प्रतिष्ठानचा महिलांच्या बाबतीत हा पहिलाच कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामुळे सर्व महिलांचे आभार मानते यापुढे असेच कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले.
   शहरातील तपनेश्वर गल्लीतील प्रभाग 6 मध्ये अयोजीत कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सामील झाल्या होत्या यावेळी त्यामुळे पैठणी कोण पटकावतो याबाबत मोठी उत्सुकता होती. यावेळी अयोजीत स्पर्धेतून प्रत्येक महिला हा खेळ खेळताना सावधगिरीने खेळत होत्या परंतु पैठणी एकजण जिंकणार असल्याने अनेक महिला आपल्या पध्दतीने खेळत असताना बाद झाल्या अखेरीस दिपाली माने यांनी पैठणी पटकावली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here