’आरंभ पॅलिएटिव्ह’तर्फे ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

’आरंभ पॅलिएटिव्ह’तर्फे ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन

'आरंभ पॅलिएटिव्ह’तर्फे ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर : जागतिक कॅन्सर दिनानिमित्त विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर सेंटर तसेच आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन स्पर्धा घेण्यात घेण्यात येणार आहेत.
   आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर 2017 पासून कॅन्सरविषयी जागरूकताचे काम करत असून दरवर्षी  आरंभ 4 फेब्रुवारी (जागतिक कॅन्सर दिनाचे) औचित्य साधून वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सर जनजागृती रॅलीचे नियोजन करते. पहिल्या वर्षी नगर ते अमरावती तसेच दुसर्‍या वर्षी नगर ते हिंगोली असे दरवर्षी साधारण सातशे कि. मी. रॅलीचे नियोजन प्रयास चे अविनाश सावजी यांच्या सोबत करण्यात आले.
   परंतु या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव असल्याने कॅन्सर जनजागृती रॅलीचे नियोजन करता आले नाही, म्हणून यावर्षी आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर व आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहे स्पर्धा चार गटात असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.aarambh.svvp.org.in या वेबसाईटवर नोंदणी करून दिनांक 2 फेब्रुवारी 2021 पर्यन्त आपला प्रवेश निश्चित करावा. दि.3 फेब्रुवारी रोजी  कॅन्सर दिनाच्या पूर्वसंध्येला स्पर्धेचा निकाल जाहीर होऊन दि.4 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण केले जाईल. ऑनलाईन स्पर्धेसाठी 9511892176 व 9422735736  या क्रमांकावर  व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा असे आवाहन आरंभतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment