श्रीराम मंदिरासाठी भगवानगड परिसरातून निधी संकलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

श्रीराम मंदिरासाठी भगवानगड परिसरातून निधी संकलन

 श्रीराम मंदिरासाठी भगवानगड परिसरातून निधी संकलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पाथर्डी ः अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीच्या जागेवर निर्माण होत असलेल्या मंदिर निर्माण कार्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट च्या माध्यमातून देशभर सुरू असलेल्या निधि संकलन अभियानाला मालेवाडी येथील तरुणांनी प्रतिसाद देत गावातील गणपती मंदिर येथे गावातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पावतीचे पूजन करत त्याप्रसंगी काही मित्रांनी एकत्रित पाच हजाराची पावती करत निधि संकलनाचा शुभारंभ केला.  देशभरात हे अभियान 31 जानेवारी पर्यंत चालणार आहे. कार्यक्रमावेळी राम जन्मभूमी आंदोलनावेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी आठवणी जाग्या केल्या.
   याठिकाणी रा.स्व.संघ पाथर्डी तालुका सहकार्यवाह श्री. महेश जरंडकर, कोरडगाव उपखंड अभियान प्रमुख श्री.बंडूशेठ घोगरे यांनी श्रीराम मंदिर निर्माण कार्याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित श्री.नामदेवभाऊ खेडकर(मा.ग्रा.सदस्य), नवनिर्वाचित ग्रा.सदस्य सुनिलसर खेडकर,  दिपक खेडकर, संभाजी दराडे, गणेश खेडकर, गणेश कीर्तने,आजिनाथ दराडे(ग्रा.सदस्य) तसेच ग्रामस्थ आणि तरुण उपस्थित होते तसेच नोकरीनिमित्त गावाबाहेर असलेल्या तरुणांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यक्रम पाहिला.
खरवंडी मंडलातील निधि संकलन श्री.गणेश जवरे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे.

No comments:

Post a Comment