महाराष्ट्राच्या चित्ररथावर झळकणार शेख महाराजांची थोरवी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

महाराष्ट्राच्या चित्ररथावर झळकणार शेख महाराजांची थोरवी

 महाराष्ट्राच्या चित्ररथावर झळकणार शेख महाराजांची थोरवी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

आष्टी ः प्रजासत्ताक दिनानिमित्त संतपरंपरा चित्ररथ दाखविण्यात येणार आहे यात वाहीरा गावचेआणि महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणारे संत शेख महंमद महाराज यांची मूर्ती चित्ररथात येणार आहे. आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र वाहिरा हे संत शेख महंमद महाराजांचे गाव.
   त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांनी गुरू मानले  तर अलमगीर बादशहाने तौयांच्या प्रबोधन व साहित्य कार्याची दखल घेत वाहिरा येथे चारशे एकर जमीन दिली. पांडुरंगाचे निस्सीम भक्त संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांची मुर्ती या वर्षीच्या  प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्ली येथे राजपथावरील  परेड मध्ये महाराष्ट्राच्या चित्र रथावर असणार आहे.
   या चित्ररथावर महाराष्ट्रातील चौदा संतांच्या प्रतिकृती बरोबर संत शेख महंमद महाराज यांची प्रतिमा झळकणार आहे. याबाबत माहिती मिळाली आणि त्यांचा आनंद वाहीरे करांना नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना आनंद गगनात मावेनासा झाला.
   महाराष्ट्राची संत परंपरा ही या चित्ररथाचे थीम आहे. यावर सर्व सुरुवातीला संत ज्ञानेश्वर माऊली यांची प्रतिमा असेल नंतर छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा सुवर्णक्षण फिरत्या देखाव्यावर असेल.
   त्याच पाठोपाठ या रथाजाच्या चहूबाजूने महाराष्ट्रातील चौदा संतांच्या प्रतिमा सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व श्री संत नामदेव महाराज, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत शेख महंमद महाराज,संत निळोबा महाराज, संत गोरोबा महाराज, यादींचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here