राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वरी कोठावळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वरी कोठावळे

 राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वरी कोठावळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथील सामाजिक क्षेत्रात कामकरत असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक   कु. राजेश्वरी कोठावळे  यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा ताई सलगर यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर  केली आहे.
   राजेश्वरी कोठावळे या पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम  करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, आमदार रोहित  पवार, मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या पुढील काळात राजेश्वरी कोठावळे या काम करणार असून अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्वरी कोठावळे यांची निवड  आज सकाळी प्रदेशाध्यक्षा सक्षणा ताई सलगर यांनी जाहीर केली.  
    राजेश्वरी कोठावळे यांचे सामाजिक राजकीय क्षेत्रात  केलेल्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दखल घेऊन त्यांच्या या कामाची ही पावती दिली आहे.   कोठावळे यांनी कोरोनाच्या काळात सहा हजार कोरोना पॉझिटिव रुग्णांना मानसिक संतुलन योग्य राहण्यासाठी योग अभ्यास शिकविला आहे.  तसेच अहमदनगर जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणासाठी काम करत असताना 10,000 युवतींना स्वयं संरक्षणाचे धडे दिले आहेत. या त्यांच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी युवती अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड  पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.  राजेश्वरी कोठावळे यांची युवती जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment