रमेश आजबे यांच्यार प्रयत्नातून डॉ. तोडकरांचे निसर्गोपचार शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

रमेश आजबे यांच्यार प्रयत्नातून डॉ. तोडकरांचे निसर्गोपचार शिबीर

 रमेश आजबे यांच्यार प्रयत्नातून डॉ. तोडकरांचे निसर्गोपचार शिबीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेडकरांच्या आरोग्यासंदर्भात डॉ स्वागत तोडकर काय म्हणाले प्रसिद्ध उद्योगपती तथा सामाजीक कार्यकर्ते रमेशदादा अजबे यांच्या प्रयत्नातुन जामखेडमध्ये घेण्यात आलेल्या निसर्गउपचार तज्ञ डॉ स्वागत तोडकर यांचे निसर्ग उपचार शिबीर व व्याख्यानास जामखेडकरांनी उत्तम प्रतीसाद नोंदवला तर यावेळी हजारो रुग्णानी शिबीराचा लाभ घेत डॉ स्वागत तोडकर यांच्याशी संवाद साधला जामखेड तालुका व परिसरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध उद्योगपती रमेशदादा अजबे यांच्या प्रयत्न व संकल्पनेतुन प्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ञ डॉ स्वागत तोडकर यांचे जामखेड येथे भव्य आरोग्य शिबीर घेण्यात आले या शिबीरादरम्यान  हजारो रुग्णानी हजेरी लावुन डॉ स्वागत तोडकर यांच्याशी संवाद करत उपचार करवुन घेत निसर्ग उपचाराची औषधी खरेदीस आपला चांगला प्रतीसाद दाखवला तसेच या निसर्ग उपचार आरोग्य शिबीरानंतर डॉ स्वागत तोडकर यांचे जामखेड येथील लना होशिंग महाविद्यालय येथे सायंकाळी सात ते आठ असे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख आतिथी म्हणुन आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार या उपस्थित होत्या डॉ स्वागत तोडकर सौ सुनंदाताई पवार आयोजक रमेशदादा अजबे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली यावेळी आयोजकाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच व्याख्यानाच्या संवादातुन सौ सुनंदाताई पवार यांनी निसर्गउपचार पद्धत चांगली असून सर्वानी तिचाच अवलंब केला पाहीजे असे सांगीतले तर डॉ स्वागत तोडकर यांनी आपल्या उपचारासाठी लागणारी सर्व औषधे अ नगर येथील स्वागत तोडकर संजीवनी निर्सग उपचार केद्रात मिळतील त्यासाठी आपण आमच्या निसर्ग उपचार केद्रातील 8975343030 , 9511113035 , आणी 9822451495 या नंबरवर संपर्क करावा असे आव्हान केले या कार्यक्रमास जामखेडकरांनी चांगली उपस्थिती नोंदवुन प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने सर्वाचे आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment